Chhagan Bhujbal: 'मराठा-ओबीसी वादावर शरद पवार तोडगा काढतील', छगन भुजबळांना विश्वास

Chhagan Bhujbal Sharad Pawar Maratha OBC Reservation : मराठा आरक्षणाचा प्रश्नावरून राज्यात सामाजिक अस्वस्थता निर्माण झाली आहे. गावागावात मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये वादाच्या भिंती उभ्या राहत आहेत, असा दावा मंत्री भुजबळ यांनी केला.
Sharad Pawar-Chhagan Bhujbal
Sharad Pawar-Chhagan Bhujbal Sarkarnama
Published on
Updated on

Chhagan Bhujbal News : मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांनी जेष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली होती. या संदर्भात येत्या दोन दिवसात काही महत्त्वाचे घडेल अशी अपेक्षा भुजबळ यांनी व्यक्त केली आहे.

'आमच्या सगळ्यांचाच अनुभव शरद पवार यांच्या तुलनेत कमी आहे. शरद पवार हे राज्यातील ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना सबंध महाराष्ट्राची सामाजिक वीण माहिती आहे. हे प्रश्न कसे सोडवावे याची त्यांना जाणीव आहे. त्यामुळे त्यांचा यामध्ये सहभाग आवश्यक आहे', असे माझे मत असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

'मी मुख्यमंत्री शिंदे यांना या विषयाची माहिती किंवा अनुभव नाही, असे म्हणालेलो नाही. मात्र त्यांचा अनुभव ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या तुलनेत कमी आहे.', असे देखील भुजबळ म्हणाले.

भुजबळ Chhagan Bhujbal यांनी आज (सोमवारी) नाशिक येथे पुन्हा एकदा आपली भूमिका मांडली आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्नावरून राज्यात सामाजिक अस्वस्थता निर्माण झाली आहे. गावागावात मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये वादाच्या भिंती उभ्या राहत आहेत, असा दावा मंत्री भुजबळ यांनी केला.

Sharad Pawar-Chhagan Bhujbal
Pankaja Munde : IAS पूजा खेडकर प्रकरणात पंकजा मुंडेंचा इशारा; म्हणाल्या, 'कायदेशीर नोटीस...'

मराठा ओबीसी वाद ही परिस्थिती राज्यासाठी चांगली नाही. यावर तातडीने तोडगा काढण्याची गरज आहे. त्या दृष्टीने प्रयत्न व्हावेत, या प्रयत्नांसाठी मी हवे ते करण्यासाठी तयार आहे. पाहिजे त्या नेत्याला भेटण्याची माझी तयारी आहे, असे भुजबळ म्हणाले.

भुजबळ आणि पवार Sharad Pawar यांच्या भेटीवरून शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या काही नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. भुजबळ यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना मराठा आरक्षणाच्या प्रश्नात फारशी समज नाही, असे म्हटले असल्यास ते अयोग्य आहे. अशी टीका होत आहे. यावर देखील भुजबळ यांनी पुन्हा एकदा स्पष्टीकरण दिले आहे.

या विषयावर संबंध महाराष्ट्रात अस्वस्थता आहे. त्यामुळे गावातील सामान्य माणसाला हा प्रश्न सुटावा, त्यावर मार्ग निघावा असे वाटते आहे. हा राजकीय विषय नसून सामाजिक प्रश्न आहे.त्याच दृष्टीने त्याकडे पाहिले पाहिजे.

राजकीय वाद सुटतात. सामाजिक वाद सोडविण्यासाठी मात्र प्रदीर्घ काम करावे लागते. त्यामुळे या विषयांमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबरोबरच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि अन्य जे जे कोण अपेक्षित असतील त्या सर्वांनी पुढाकार घेऊन मार्गदर्शन केले पाहिजे.

मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांना देखील हेच हवे आहे. त्यामुळे त्या दोन दिवसात शरद पवार याबाबत पुढाकार घेऊन संबंधितांना निरोप देतील. या विषयात ठोस असे काहीतरी बाहेर पडेल, असा विश्वास यावेळी भुजबळ यांनी व्यक्त केला.

(Edited By Roshan More)

Sharad Pawar-Chhagan Bhujbal
Video IAS Pooja Khedkar : IAS पूजा खेडकर प्रकरणात पोलिस महासंचालकांनी घातले लक्ष, दिले मोठे निर्देश !

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com