Bhanudas Kotkar Congress leader : 'ऑपरेशन लोटस'ला वेग; काँग्रेसचे भानुदास कोतकरांची भाजप मेळाव्यात एन्ट्री!

Congress Leader Bhanudas Kotkar Attends BJP Meeting in Ahilyanagar with Minister Radhakrishna Vikhe : मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या 'ऑपरेशन लोटस'ने वेग घेतला असून, काँग्रेसचे स्थानिक नेते देखील भाजप मेळाव्याला उपस्थित राहू लागले आहेत.
Bhanudas Kotkar Congress
Bhanudas Kotkar CongressSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar BJP meeting : पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जाहीर केलेल्या 'ऑपरेशन लोटस'ने वेग पकडला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक मंत्री विखे पाटील अहिल्यानगरमध्ये 'ऑपरेशन लोटस' जाहीर केलं. उत्तरेकडून सुरू झालेलं हे 'ऑपरेशन लोटस' थेट अहिल्यानगर शहरात येऊन आता धडकलं.

भाजपच्या मेळाव्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाला धक्का दिला. ठाकरे सेना पक्षातील पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यात लक्षवेधी घटना घडली ती, पूर्वाश्रमीचे काँग्रेस नेते भानुदास कोतकर यांची उपस्थित होती. यामुळे अहिल्यानगरमध्ये वेगवान राजकीय घडामोडी घडत आहे.

भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe) यांच्या उपस्थित अहिल्यानगर शहरात भाजपचा मेळावा झाला. यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे माजी उपमहापौर पुष्पा बोरुडे यांचे पती माजी नगरसेवक अनिल बोरुडे, माजी नगरसेवक सुभाष लोंढे, उपजिल्हाप्रमुख जालिंदर वाघ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मंत्री विखे पाटील यांनी त्यांचे स्वागत केले.

कोतकरांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा

या पक्ष प्रवेश कार्यक्रमाला नगर तालुका बाजार समितीचे माजी सभापती तथा पूर्वाश्रमीचे काँग्रेस (Congress) नेते भानुदास कोतकर हे व्यासपीठावर उपस्थित होते. धनंजय जाधव यांनी त्यांचे स्वागत केले. यामुळे भानुदास कोतकर यांचा भाजपमध्ये प्रवेश झाल्याची चर्चा होती. मात्र कोतकर यांनी पक्षप्रवेश झाला नसल्याचे स्पष्ट केले. कोतकर हे भाजपचे दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अरुण जगताप यांचे व्याही आहेत.

Bhanudas Kotkar Congress
NCP Politics : थेट पक्षनेतृत्वाला इशारा देणाऱ्या इंदापूरमधील नेत्याला अजितदादांनी डावललं, अखेर मनासारखंच करत 'या' नेत्याला नगराध्यक्षपदाच्या मैदानात उतरवलं

उमेदवारी सर्वेक्षणानंतर

महापालिका निवडणुकीत उमेदवारी कशी निश्चित होणार, यावर मंत्री विखे पाटील यांनी भाष्य केले. ते म्हणाले, "महापालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वेक्षण करून उमेदवारी दिली जाईल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपचा झेंडा फडकवा, पूर्ण ताकदीने निवडणुकीत उतरा, भाजप इतर पक्षांवर नाही, तर इतदर पक्ष भाजपवर अवलंबून आहेत."

Bhanudas Kotkar Congress
Indurikar Maharaj grand wedding challenge : मुळावर उठलेल्या औलादींना इंदुरीकर महाराजांचं चॅलेंज; मुलीचं लग्न साखरपुड्यापेक्षा टोलेगंज करणार

नगरपालिकांमध्ये भाजप एक नंबर

अहिल्यानगर जिल्ह्यातील नगरपालिकांच्या निवडणुकीत काही ठिकाणी पक्ष स्वबळावर लढत आहे. काही ठिकाणी युती झाली आहे, तर काही ठिकाणी महायुती झाली आहे. पण, नगरपालिकांमध्ये भाजप पक्ष एक नंबर राहिल, असे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

तनपुरेंचा कट्टर कार्यकर्ताचा भाजप प्रवेश

राहुरी नगरपरिषदेच्या निवडणुकीत रंग भरू लागला आहे. विकास मंडळाचे अध्यक्ष रावसाहेब (चाचा) तनपुरे यांना जोरदार धक्का दिला. त्यांचे कट्टर समर्थक माजी नगरसेवक व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुनील ठकाजी पवार यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे भाजपतर्फे सुनील पवार यांची नगराध्यक्षपदाची उमेदवारी निश्चित झाल्याचे बोलले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com