
Maharashtra politics 2025 : जम्मू-काश्मीर पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्करानं ऑपरेशन सिंदूर अंतर्गत एअर स्ट्राइक करत, जोरदार प्रत्युत्तर दिलं. भारत-पाकिस्तान हे दोन्ही देशाचे लष्कर आमने-सामने येत युद्ध परिस्थिती निर्माण झाली. गेल्या चार दिवसांपासून दोन्ही देशांच्या सीमांवर तणावाचे वातावरण आहे. ही परिस्थिती हातळण्यात केंद्रातील मोदी सरकारची मुत्सद्देगिरी कुजकामी ठरत असल्याची विरोधक टीका करत आहेत.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह विरोधक ही युद्ध परिस्थिती हाताळण्यात मोदी सरकार कमी पडत असल्याची टीका करत आहेत. भाजप मंत्री गिरीश महाजन यांनी राऊत, आव्हाड यांच्यासह विरोधकांवर जोरदार टीका केली. तसंत स्थानिक संस्थांच्या निवडणुका पुढं जातील, असे संकेत देखील दिले.
मंत्री गिरीश महाजन म्हणाले, "पाकिस्तानने वेळीच कुरापती थांबविल्या नाही, तर त्यांना चोख प्रत्युत्तर मिळेल. भारतीय सैन्य दल व पंतप्रधान मोदींवर देशाचा पूर्ण विश्वास आहे. पण खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांना काही काम नसल्यामुळे ते विरोध करतात. युध्दजन्य परिस्थितीत पंतप्रधान, गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करतात". आपल्याकडेच असे अतिरेकी असल्यावर बाहेरच्यांची गरज काय? असा प्रश्न मंत्री महाजन यांनी केला.
महात्मा गांधींवरील हल्ला काँग्रेसला (Congress) दहशतवादी वाटत असेल, तर त्याला आम्ही काहीच करू शकत नाही. पाकिस्तानची परिस्थिती अत्यंत दयनिय असून त्यांच्याकडे खायला पैसे नाहीत. त्यांच्याकडे एक नेतृत्व नाही. अंतर्गत वाद असल्यामुळे पाकिस्तानची वाईट अवस्था झाली आहे. भारत प्रगतीपथावर आहे. त्यामुळे युध्द थांबले तर देश हिताचे ठरेल, असेही मंत्री महाजन म्हणाले.
नाशिकमध्ये कुंभमेळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. कामं सुरळीत सुरू असल्यानं नाराजी असण्याचा काहीच कारण नाही. मंत्रिमंडळाने त्यासाठी निधी मंजूर केला आहे. कुंभमेळ्याच्या दृष्टीने आवश्यक कामे वेळेत पूर्ण होतील. साधू, महंत व नागरिकांना कुठल्याही दुरवस्थेचा सामना करावा लागणार नाही, असेही मंत्री महाजन यांनी सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांत घेण्याचा आदेश दिला आहे. भारत-पाकिस्तान दोन्ही देशातील सद्यस्थिती आणि पुढील चार महिने पावसाळा बघता या निवडणुका पुढे जातील, असे भाकीत मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.