Ladki Bahin Scheme : धक्कादायक!, 'लाडक्या बहिणीं'च्या नावाने मुंबईकरांना गंडा'; खात्यांचा वापर लॉन्ड्रींगसाठी

Ladki Bahin Scheme Scam : महायुतीला विधानसभा निवडणूक 2024 मध्ये भरघोस बहूमत मिळले. हे यश 'लाडकी बहीण' योजनेमुळे मिळाले.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin YojanaSarkarnama
Published on
Updated on

Mumbai Crime News : नुकताच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले. या यशामागे 'लाडकी बहीण' योजना होती. पण आता याच योजनेच्या नावाखाली हजारो मुंबईकरांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी जुहू पोलिसांनी गुजरातमधून तीन आरोपींना अटक केली आहे. या टोळीने मुंबईतील विविध भागात 2500 लोकांना गंडा घातल्याचे आता समोर आले आहे.

जुहू पोलिसांच्या माहितीनुसार अटक करण्यात आलेले आरोपी गुजरातमधील सूरतमधील आहेत. जे मुंबईतील झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्यांना 'लाडकी बहीण' योजनेच्या नावाने लुटत होते. या टोळीने नेहरु नगर, डी.एन. नगर, धारावीमधील नागरिकांना योजनेतून पैसे मिळवून देतो म्हणत बँक खाती सुरू केली होती. याबाबचे 'मिड डे'ने दिलं असून खाती उघडताच 1000 हजार देण्यात आले होते. तर उर्वरीत 500 नंतर जमा होतील असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र ही खाती या टोळीने लॉन्ड्रींग करणाऱ्या आरोपींना विकल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी या टोळीकडून मिळवलेल्या माहितीत फक्त महिलाच नाहितर पुरुषांच्या नावानेही खाती उघडल्याचे समोर आले आहे. तर जी खाती उघडण्यात आली त्यांचे व्हेरिफिकेशन आणि पात्रता काही बँकांनी केली नसल्याचेही आता उघड झाले आहे.

असे आले समोर प्रकरण

या प्रकरणात नेहरुनगरमधील 22 वर्षीय रहिवाशी वलिक सय्यद खान याने विले-पार्ले पोलिसात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत त्यांनी, 13 फेब्रुवारी रोजी काही तरूणांनी 'लाडकी बहीण' योजनेअंतर्गत महिन्याला दीड हजार रुपये मिळतील असे सांगत आधार कार्ड तसेच पॅन कार्डची मागणी केली होती. तर त्याच कागद पत्रांच्या आधारे बँकेत खाते उडल्यानंतर 1000 रूपये वलिकच्या पत्नीला देण्यात आले होते. तसेच इतरांना देखील खाते उघडण्यास प्रवृत्त करा असे सांगण्यात आले होते.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Scheme : '1500 चं' हातावर टेकवणाऱ्या महायुतीला केंद्रीय मंत्र्यांचा 'घरचा आहेर'

दरम्यान काही जणांची खाती उघडायची असल्याची माहिती वलिकने संबंधित टोलीतील एका दिली. ज्यानंतर तो तेथे गेला. मात्र यावेळीच स्थानिकांना या व्यक्तीवर संशय आल्याने याची माहिती जुहू पोलिसांना देण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित चव्हाण यांनी तातडीने तपासाची सुत्रे हालवत त्या संशियताला ताब्यात घेतलं. त्याचे नाव अविनाश कांबळे (वय - 25रा. वसई) असून त्याने आपल्या जबाबात फाल्गून जोशी, रितेश जोशी, प्रतिक, श्रृती रवी राऊत यांची नावे घेतली. तसेच यांनीच खाती उघडण्याचे ऑफर देताना प्रत्येक खात्यामागे 4 हजार रुपये दिल्याचेही त्याने सांगितले.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Scheme : महायुतीची महत्वाकांक्षी 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजना वादाच्या भोवऱ्यात; वित्त विभाग 'टेन्शन'मध्ये!

खाती उघडल्यानंतर खात्याशी संलग्न सीमकार्ड, कागदपत्र घेवून ती लॉन्ड्रींग करणाऱ्या आरोपींना विकली जात होती. अशा पद्धतीने 100 हून अधिक खात्यांमध्ये 19 लाख 43 हजार 779 रुपयांचा व्यवहार उघड झाला असून ती खाती गोठवण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक लांडगे यांनी दिली आहे. या खात्यांचा सायबर गुन्हे आणि मनी लॉन्ड्री शिवाय काळ्या पैशांच्या व्यवहारासाठी वापर होत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लांडगे यांनी सांगितले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com