BJP vs Congress Sangamner : विखे-थोरात समर्थकांत जुंपली; यावेळी निमित्त ठरलंय ग्रामपंचायत...

Clash Between BJP Radhakrishna Vikhe and Congress Balasaheb Thorat Supporters in Sangamner Jorwe and Gunjalwadi Panchayats : संगमनेरमधील जोर्वे आणि गुंजाळवाडी ग्रामपंचायतीमधील विखे आणि थोरात समर्थक आमने-सामने आले आहेत.
BJP vs Congress Sangamner
BJP vs Congress SangamnerSarkarnama
Published on
Updated on

Radhakrishna Vikhe Vs Balasaheb Thorat : संगमनेर तालुक्यातील जोर्वे ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी करत, याची चौकशी करण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे. दरम्यान, गैरव्यवहाराचे आरोप झालेले आजी-माजी सरपंच हे नात्यानं पती-पत्नी असून ते पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचे समर्थक आहेत.

तर संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी ग्रामपंचायतीनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती साजरी करण्याची फक्त औपचारिकता दाखवल्याची तक्रार महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केली. सरपंच अमोल गुंजाळ यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी गटविकास अधिकाऱ्यांकडे केली.

संगमनेर तालुक्यातील जोर्वे हे गाव माजी मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांचे जन्मगाव आहे. या गावतून थोरात यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली. हे गाव संगमनेर तालुक्यात असले, तरी विधानसभेसाठी भाजप मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या शिर्डी मतदारसंघात आहे. गावातील स्थानिक, सहकारी संस्थांवर प्रदीर्घ काळापासून बाळासाहेब थोरात गटाचं वर्चस्व आहे.

मात्र, सध्या ग्रामपंचायतीमध्ये मंत्री विखे (Radhakrishna Vikhe) समर्थक सरपंच, थोरात समर्थक उपसरपंच आहे. त्यामुळे राजकीयदृष्ट्या जोर्वे ग्रामपंचायत संवेदनशील बनली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगूल कधीही वाजू शकतो. त्यामुळे ग्रामपंचायतीमधील दोन्ही बाजूचे समर्थक कोणत्याही कोणत्या मुद्यावरून आक्रमक होतात. राजकीय वादविवाद वाढवितात. काही दिवसांपूर्वी झालेल्या गावच्या ग्रामसभेत गैरव्यवहाराचा आरोपानं चांगलीच गाजली.

BJP vs Congress Sangamner
LNP CPI ML Liberation Merger : एलएनपी अन् भाकप ऐक्यासाठी श्रीरामपूर का? डाव्या चळवळीच्या नव्या एकतेचा टप्पा की, अस्तित्वाचा लढा?

औषध खरेदीत गैरव्यवहार

गावकऱ्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देताना 2022-23 मध्ये तत्कालीन उपसरपंच गोकुळ दिघे आणि ग्रामविकास अधिकारी यांनी सुमारे 8.53 लाख रुपयांचा अपहार केला. यात बाकडे खरेदी, मेडिक्लोर औषध खरेदी, फवारणीसाठी लागणारे औषध खरेदीत बोगस बिलांचा वापर केला.

BJP vs Congress Sangamner
Tanpure sugar factory election : 'सहकार हा लाॅटरीचा खेळ नव्हे'; 'तनपुरे'निमित्तानं एकनाथ शिंदेंना विखेंचा सूचक इशारा

योजनांमध्ये अनियमितता

त्याचप्रमाणे 2024-25 मध्ये 15व्या वित्त आयोगाच्या निधीतून विद्यमान सरपंच प्रीती गोकुळ दिघे आणि ग्रामविकास अधिकारी यांनी संगमताने अपहार केल्याचा गंभीर आरोप केला. महिला सबलीकरणाच्या नावाखाली 4 लाख 12 हजार 560च्या शिलाई मशीन खरेदी आणि 2 लाख 99 हजार रुपयांच्या कचराकुंडी खरेदीतील गैरव्यवहांचा समावेश आहे. 'नल-जलमित्र' योजनेत देखील अनियमितता झाल्याचा देखील आरोप करण्यात आला आहे.

तक्रार करूनही कारवाई नाही

पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांऐवजी तिसऱ्याच व्यक्तीच्या खात्यावर सुमारे 50 हजार रुपये वळवण्यात आले. 'आपले सरकार पोर्टल'वर तक्रार करून देखील चौकशी होत नाही, असा आरोप ग्रामस्थांनी केली. उपसरपंच बादशाह बोरकर, सदस्य दिंगबर इंगळे यांच्यासह ग्रामस्थांनी या अपहारच्या चौकशीसाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

महायुती समर्थकांची तक्रार

दरम्यान, दुसरीकडे संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी ग्रामपंचायत गावात देखील महायुतीच्या समर्थकांनी सरपंच अमोल गुंजाळ यांच्याविरोधात तक्रार केली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम औपचारिकता म्हणून उरकला. उत्कृष्ट काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान न करता हा कार्यक्रम उरकला, अशी तक्रार करत कारवाईची मागणी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com