Radhakrishna Vikhe : 'ते महाराष्ट्रात येऊन जातील, नंतरची जबाबदारी कोणाची?' राहुल गांधींच्या दौऱ्यावर मंत्री विखेंना वेगळीच भीती!

BJP Minister Radhakrishna Vikhe Ahilyanagar Congress Rahul Gandhi Parbhani : काँग्रेस नेते लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या उद्याच्या परभणी दौऱ्यावर भाजप मंत्री राधाकृष्ण विखे यांनी मोठा प्रश्न उपस्थित केलाय.
Radhakrishna Vikhe 1
Radhakrishna Vikhe 1Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : काँग्रेस नेते तथा लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या उद्याच्या परभणीच्या दौऱ्यावर भाजप नेते मंत्री राधाकृष्ण विखे यांनी अनाहूत भीती व्यक्त केली.

"परभणीची घटना दुर्दैवी आहे. परंतु विरोधकांनी तिथं राजकारण करू नये. विरोधकांच्या या भूमिकेमुळे सामाजिक, जातीय तणाव वाढतो. राहुल गांधी एक दिवस येऊन जातील महाराष्ट्रात, पण त्याचे पडसाद उमटणार आहे, त्याची जबाबदारी राहुल गांधी घेणार आहे का?", असा सवाल मंत्री विखेंनी केला.

भाजपचे (BJP) राधाकृष्ण विखे म्हणाले, "परभणी आणि बीड घटनेचे राजकारण करण्याचे काम थांबवावे. या घटनेत राजकारण करण्याची विरोधक संधी शोधत आहे. पण ती मिळणार नाही. कारण सरकार त्यावर काम करत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लक्ष ठेवून आहे. घटनेशी निगडीत प्रत्येक घटनेची चौकशी केली जात आहे. तशी ती घटना दुर्दैवी आहे. या घटनेत विरोधकांनी राजकारण करू नये. यातून सामाजिक, जातीय तणाव वाढतो". राहुल गांधी एक दिवस येऊन जातील महाराष्ट्रात, याचे पडसाद उमटणार आहे, त्याची जबाबदारी राहुल गांधी घेणार आहे का?, असा सवाल मंत्री विखे यांनी केला.

जरांगेंनी चर्चेसाठी पुढं यावं

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी 25 जानेवारीपासून सामूहीक उपोषणाची घोषणा केली आहे. यावर मंत्री विखे यांनी जरांगे यांना आवाहन केले आहे. "कायदेशीर चौकटीत बसेल असे मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण दिले आहे. सर्वोच्च न्यायालयात देखील ते टिकले होते. महाविकास आघाडी (MVA) सरकारच्या दुर्लक्षपणामुळे मराठा आरक्षण घालवले. पण महायुती सरकार मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक आहे. कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता आरक्षणाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे जरांगे पाटलांनी आंदोलनापेक्षा चर्चेसाठी पुढं यावं. आम्ही त्यावर काम करू. नवीन सरकार आहे. थोडा वेळ मिळाला पाहिजे. तशी आमची विनंती आहे", असे विखे यांनी म्हटले.

Radhakrishna Vikhe 1
TOP Ten News : भाजपची 'स्थानिक'च्या निवडणुकीपूर्वी महाअधिवेशनाची तयारी.., पवारांनी फडणवीसांना परभणीचे गांभीर्य सांगितलं.., वाचा महत्त्वाच्या घडामोडी...

बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करणार

मिळालेल्या खात्यावर अतिशय समाधानी आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री विखे यांनी दिली. "महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी सोपावली. हे खाते मिळताच दिवंगत लोकनेते बाळासाहेब विखेंची आठवण झाली. गोदावरी तुटीचे खोरं आहे. नद्यांमधून पुढे कोकणात पाणी वाहून जाते. या खोऱ्यात पाणी आणलं पाहिजे, असा बाळासाहेबांचा आग्रह होता. तेच स्वप्न पूर्ण करण्याचे दायित्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यांनी माझ्यावर दिले आहे. शेती, पाण्याचे प्रश्न निर्माण होत आहे. पाणी वितरणातील सुधारणा करायची आहे. चांगली जबाबदारी मिळाल्याचे समाधान आहे".

विरोधी पक्षांचा अवतार संपला

विरोधकांकडे विरोधी पक्षनेता मिळेल, एवढे संख्याबळ देखील नाही. यावर मंत्री विखे म्हणाले, विरोधी पक्षांचा अवतार संपला आहे. तसा तो निवडणुकीतच संपला होता. जनाधार आमच्याबरोबर आहे. विरोधकांचे अस्तित्व फार काळ टिकणार नाही, असा चिमटा मंत्री राधाकृष्ण विखे यांनी विरोधकांना काढला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com