Maharashtra Drought : भाजप आमदाराच्या समर्थकांकडून दुष्काळाचाही उत्सव! 'आभार' बॅनरबाजीवरून विरोधक आक्रमक

NCP Sharad Pawar News: नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, यासाठी विरोधी पक्षांनी आंदोलन केले होते. मात्र, दुष्काळ जाहीर झाल्यानंतर सत्ताधारी आमदाराच्या समर्थकांकडून लावलेल्या बॅनरमुळे नवा वाद निर्माण झाला आहे.
Drought Banners Trigger Political Row in Baglan NCP-SP Targets Dilip Borase
Drought Banners Trigger Political Row in Baglan NCP-SP Targets Dilip Borasesarkarnama
Published on: 
Updated on: 

Drought Nashik : राज्यभर दुष्काळ आणि टंचाईने शेती व शेतकरी संकटग्रस्त आहे. अनेक ठिकाणी आत्महत्या झाल्या आहेत. सत्ताधारी महायुतीचे नेते मात्र या स्थितीतही राजकारण करण्यात दंग असल्याची टीका होते आहे. आमदार समर्थकांनी लावलेले बॅनरमुळे चर्चा सुरू आहेत.

राज्य शासनाने विरोधी पक्षांच्या दबावानंतर राज्यात दुष्काळ जाहीर केला. मात्र सत्ताधारी भाजपला दुष्काळाची घोषणा हा देखील विकास कामांची घोषणाच वाटत आहे. भाजप आमदार दिलीप बोरसे यांच्या समर्थकांनी तालुक्यात दुष्काळ जाहीर केल्याने धुमधडाक्यात गावभर आभाराचे फलक झळकवले आहेत.

बागलाण तालुक्यात दुष्काळ जाहीर केल्याने मुख्यमंत्री तसेच शासनाचे आभार मानणारे फलक भाजपने लावले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि विरोधकांनी त्यावर संताप व्यक्त केला आहे. बागलाणमध्ये या निमित्ताने दुष्काळाचाही आनंदोत्सव होत असल्याची टीका त्यांनी केली.

बागलाण (सटाणा) तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देण्याऐवजी दुष्काळ जाहीर झाल्याचे श्रेय घेण्यासाठी भाजपच्या पदाधिकारींकडून बॅनरबाजी सुरू असल्याची तीव्र नाराजी बागलाणचे माजी आमदार संजय चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.

बागलाण तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार संजय चव्हाण यांच्या संपर्क कार्यालयात बैठक झाली. यावेळी बोलताना चव्हाण म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अनावश्यक खर्च टाळण्याचे आवाहन केले होते, मात्र त्यांच्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून लाखो रुपये खर्चून दुष्काळाचा आनंदोत्सव साजरा केला जात असल्याचे चित्र दुर्दैवी आहे.

दुष्काळ जाहीर करण्यासाठी शेतकरी संघटना, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासह विविध राजकीय पक्ष आणि कार्यकर्त्यांनी सातत्याने आंदोलने व मागण्या केल्या. मात्र शासनाकडून बागलाणचा दुष्काळी तालुक्यांच्या यादीत समावेश होताच त्याचे श्रेय घेण्यासाठी तालुक्यातील गावोगावी लाखो रुपयांचे बॅनर लावण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. शेतकरी संकटात असताना दुष्काळाचा उत्सव साजरा करण्याऐवजी त्यांना प्रत्यक्ष मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नांची खरी गरज आहे, असे ते देखील ते म्हणाले.

या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष केशव मांडवडे, कार्याध्यक्ष संजय पवार, शहराध्यक्ष भारत काटके, शहर कार्याध्यक्ष मनोज छोटू सोनवणे, चेतन वणीस, मयूर अहिरे, पोपटराव सोनवणे, विलास सोनवणे, स्वप्नील सोनवणे, झिपरू सोनवणे, जनार्दन सोनवणे, साहेबराव सोनवणे, सुभाष झाल्टे, युवराज निकुंभ, कल्याणसिंग वाघ, सुरेश सोनवणे, बाळासाहेब देवरे, रणजीत ठाकरे, बाळासाहेब चव्हाण, पोपट चव्हाण आदी उपस्थित होते.

भाजपने सरणावर पोळ्या पाजू नये

शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आहे. अशा स्थितीत त्यांना न्याय मिळावा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरून आंदोलन करीत होते. तेव्हा भाजप सत्तेत असूनही मख्ख होता. आता सरकार विरोधकांपुढे नमले. अशा स्थितीत दुष्काळ जाहीर झाल्याचा आनंदोत्सव कसला..? हे तर सरनावर पोळ्या भाजण्याचे काम आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष केशव मांडवडे यांनीकेली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com