Shivaji Kardile : शेतकरी, कार्यकर्त्यांच्या ऊसतोडीसाठी टाळाटाळ; आमदार कर्डिलेंचा विरोधकांना इशारा

BJP MLA Shivaji Kardile sugarcane politics Ahilyanagar Rahuri : राहुरी विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांनी ऊसतोडीसाठी कार्यकर्त्यांना वेठीस धरण्यावरून विरोधकांना इशारा दिला आहे.
Shivaji Kardile
Shivaji Kardileेोीकोीलोसो
Published on
Updated on

Ahilyanagar News : निवडणुकीनंतर देखील राहुरी विधानसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण तापलेलेच आहे. कर्डिले अन् तनपुरे समर्थक काही दिवसांपूर्वी धुमश्चक्री झाली होती. या हाणामाऱ्यांमध्ये थेट गोळीबार झाला. हे प्रकरण शांत होत नाही, तोच आता भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांनी एका गंभीर मुद्यावरून, विरोधकांना इशारा दिलाय.

राहुरी तालुक्यात ऊसतोडीबाबत शेतकऱ्यांना, कार्यकर्त्यांना काही अडचणी आल्यास भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे किंवा मला संपर्क साधा, असे आवाहन केले आहे.

राहुरी विधानसभा मतदार संघातील निवडणूक अटीतटीची झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाचे प्राजक्त तनपुरे आणि भाजपचे शिवाजी कर्डिले यांच्यात सरळ लढत झाली. या लढतीत मतमोजणीच्या शेवटपर्यंत विजयाची लढाई रंगली होती. यात शिवाजी कर्डिले विजयी झाले. मात्र तनपुरे आणि कर्डिले समर्थक आता एकमेकांना भिडू लागलेत. काही दिवसांपूर्वी झालेल्या हाणामारीमध्ये गोळीबार झाला होता. यात चौघे जखमी झाले आहेत.

Shivaji Kardile
Ajit Pawar Politics : 29 वर्षांपासूनचा मंत्रीपदाचा दुष्काळ हटणार? अजितदादा अहिल्यानगर शहराला सुखद धक्का देणार

हाणामारीचे हे प्रकरण शांत होत नाही, तोच भाजपचे (BJP) आमदार शिवाजी कर्डिले यांनी राहुरील एका मुद्यावरून विरोधकांना इशारा दिलाय. माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांचे नाव न घेता दिलेला हा इशारा आगामी राजकीय संघर्षाची तयारी आहे, असे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे.

Shivaji Kardile
Vivek Kolhe : कोल्हेंचा निष्ठेचा आयाम; भाजपकडून फळ मिळणार का?

'शिवाजी कर्डिले यांनी आमच्या प्रचारात सक्रिय असलेल्या कार्यकर्त्यांच्या ऊसतोडीसाठी टाळाटाळ करण्याचा प्रकार राहुरीतील काही ठिकाणी सुरू आहे. याची माहिती मिळाली आहे. परंतु राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी ऊस तोडी बाबत काळजी करू नये. तसेच वेळेपूर्वी ऊस तोडण्याची घाई देखील करू नये. ऊसतोडीबाबत अडचण निर्माण झाल्यास तात्काळ आपल्याशी संपर्क साधावा', असे आवाहन केले आहे.

शेतकऱ्यांबाबत राजकारण बाजूला ठेवा

'भाजपचे नेते मंत्री राधाकृष्ण विखे व माजी खासदार सुजय विखे यांच्या सहकार्याने प्रवरा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून त्यांना ऊसतोडीसाठी न्याय दिला जाईल. निवडणूक ही ठराविक काळापूर्ती असते यामध्ये लोकशाही मार्गाने मतदार सभासद कार्यकर्ते भूमिका घेत असतात. निवडणूक संपल्यानंतर राजकारण बाजूला ठेवून काम करणे महत्त्वाचे असते. परंतु काही ठिकाणी केवळ राजकारणालाच महत्त्व दिले जात आहे. त्यामुळे काहीवेळी प्रामाणिक शेतकऱ्यांवर अन्याय होऊ शकतो. परंतु कोणत्याही शेतकऱ्यांनी काळजी न करता ऊसतोडीबाबत समस्या असेल, तर संपर्क साधा. प्रवरा कारखान्याच्या माध्यमातून न्याय देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू', असे आमदार कर्डिले यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com