Ajit Pawar Politics : 29 वर्षांपासूनचा मंत्रीपदाचा दुष्काळ हटणार? अजितदादा अहिल्यानगर शहराला सुखद धक्का देणार

Ajit Pawar MLA Sangram Jagtap Ahilyanagar city assembly constituency : राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर त्यांच्यासोबत अहिल्यानगर जिल्ह्यातून असलेले पहिले आमदाराला मंत्रीपदाची लाॅटरी लागण्याची शक्यता आहे.
Ajit pawar
Ajit pawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : महायुतीत मुख्यमंत्रीपद आणि मंत्रीपदावरून भाजप अन् एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत धुसफूस सुरू आहे. कोणाला कोणती खाती मिळणार यावरून राजकीय घमासान सुरू असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार मात्र बिनधास्त दिसताय.

विधानसभा निवडणुकीनंतर त्यांनी कामाला देखील वेगानं सुरवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला महायुतीत किती मंत्रीपद येतात, आणि अजितदादा कोणाकोणाला संधी देतात, याची उत्सुकता आहे. अजितदादा पक्षातील आमदारांना मंत्रीपद वितरीत करतील, तेव्हा अहिल्यानगर शहर मतदारसंघाचा विचार करतील, अशी जोराची चर्चा रंगली आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सत्ता आल्यावर शरद पवार (Sharad Pawar) यांनी अहिल्यानगर प्राजक्त तनपुरे यांना मंत्रीपद दिले. तसेच उद्धव ठाकरे यांनी शंकरराव गडाख यांना देखील मंत्रीपद दिले. ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात देखील मंत्रिमंडळात होते. शरद पवार यांनी प्राजक्त तनपुरे यांनी मंत्रीपदासाठी फोन केला होता. तनपुरे यांची मंत्रीपदावर लागलेल्या वर्णीचा किस्सा अहिल्यानगर जिल्ह्यात चांगलाच रंगला होता. त्याचपद्धतीने अजितदादा नगरबाबत विचार करतील, अन् सुखद धक्का देतील, अशी चर्चा रंगली आहे.

Ajit pawar
Karjat Jamkhed Assembly Election : निकाल काय लागणार? 'या' तणावात दोघांचे 'हार्ट फेल'

शिवसेनेचे दिवंगत नेते अनिल राठोड यांन 1995 मध्ये शिवसेना-भाजप (BJP) युती सरकारमध्ये अन्न व पुरवठा राज्यमंत्री म्हणून काही काळ काम केले. तेव्हापासून ते आतापर्यंत, म्हणजे, गेल्या 29 वर्षांपासून अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघाला मंत्रीपद मिळालेले नाही. त्यामुळे अजितदादा आमदार संग्राम जगताप यांच्या रुपाने हा बॅकलॉग भरून काढतील, अशी चर्चा रंगलीय.

Ajit pawar
Chhagan Bhujbal Politics: अखेर छगन भुजबळ यांनी मान्य केला जरांगे पाटील इफेक्ट, म्हणाले...

अनिल राठोड यांचा 2014च्या निवडणुकीत संग्राम जगताप यांनी पराभव केला. यानंतर 2019 आणि आता 2024च्या निवडणुकीत जगताप यांनी विजयाची हॅटट्रिक केली. शरद पवार यांची अजित पवार यांची साथ सोडल्यानंतर अजित पवार यांच्याबरोबर अहिल्यानगर जिल्ह्यातून पहिले कोण उभं राहिले असेल, तर ते आमदार संग्राम जगताप होते. नीलेश लंके देखील अजित पवार यांच्याबरोबर होते. परंतु लोकसभा निवडणुकीत त्यांनी अजितदादांची साथ सोडली अन् शरद पवार यांच्याकडे परत आले. आता ते खासदार आहेत.

आमदार संग्राम जगताप यांनी आमदारकीच्या विजयाची यंदा हॅटट्रिक साधली. यातच त्यांनी अजितदादांवर विश्वास कायम ठेवला. त्यामुळे त्यांना महायुती सरकारमध्ये मंत्रीपद मिळणार अशी चर्चा आहे. तसे जगताप समर्थक, कार्यकर्त्यांनी देवाला साकडे घालण्यास सुरवात केली आहे. काही उत्साही कार्यकर्त्यांनी मंत्रीमहोदय म्हणून 'बॅनर'बाजी देखील केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com