Nashik BJP Politics: शिक्षण मंत्री दादा भुसेंवर भाजप आमदारांची कुरघोडी; भुसेंनी पोलीस आयुक्तांची भेट घेताच आमदार झाले सक्रीय!

BJP MLAs active on crime, BJP meet CP after Minister Dada Bhuse, Devyani Pharande assures change in a week-नाशिक शहरातील वाढत्या गुन्हेगारीने नागरिक त्रस्त; आमदार देवयानी फरांदे म्हणतात, येत्या सात दिवसात परिणाम दिसेल?
Dada Bhuse & Devyani Pharande
Dada Bhuse & Devyani PharandeSarkarnama
Published on
Updated on

Nashik Crime News: नाशिक शहरातील गुन्हेगारी हा नागरिकांच्या दृष्टीने चिंतेचा विषय बनला आहे. खून आणि वाहनांची मोडतोड यामध्ये टोळ्या सक्रिय आहेत. वाढत्या गुन्हेगारीने नाशिक शहरवासीय त्रस्त आहेत.

गेले काही महिने नाशिक शहरातील गुन्हेगारी शिगेला पोहोचली आहे. गेल्या दोन महिन्यात चाळीसहून अधिक खून झाले. या विरोधात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने सरकार विरोधात मोर्चा उघडला होता.

या पार्श्वभूमीवर शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली. शहरातील वाढत्या गुन्हेगारी बाबत पोलीस अधिकाऱ्यांची चर्चा केली. मंत्री भुसे यांनी पोलिस अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली. त्यामुळे सत्ताधारी महायुतीचे अन्य पक्षही अलर्ट झाले आहेत.

Dada Bhuse & Devyani Pharande
Devendra Fadnavis Politics: अतिवृष्टीमुळे कर्जमाफीचे राजकारण पुन्हा तापले; जिल्हा बँकांपुढे नवे संकट तर मुख्यमंत्र्यावर विरोधकांचा दबाव!

या पार्श्वभूमीवर भाजप सक्रिय झाली आहे. शहरातील आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे आणि राहुल ढिकले यांनी पोलिस आयुक्तांची भेट घेतली. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी शहरातील गुन्हेगारी नियंत्रण आणण्यासाठी विविध सूचना केल्या होत्या.

Dada Bhuse & Devyani Pharande
Mangesh Chavan Politics : आमदार मंगेश चव्हाण यांना भाजप नेत्यांकडूनच दणका! थेट फडणवीसांकडे वाचला तक्रारींचा पाढा!

शहरात सप्टेंबर अखेर ४२ हून अधिक खून झाले. विविध टोळ्या राजकीय आशीर्वादाने रोज गुन्हे करीत आहेत. वाहनांची मोडतोड, खंडणी आणि अमली पदार्थांच्या विक्रीने नाशिक शहर चर्चेत आले आहे. या गुन्हेगारीने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

यावेळी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शहरातील अंबड इंदिरानगर सातपूर परिसरात पोलीस बळ वाढविणार असल्याचे सांगितले. गुन्हे शाखेच्या माध्यमातून कोंबिंग ऑपरेशन आणि गुन्हेगारांची धरपकड केली जाणार आहे. पोलीस अधिकारी तीन शिफ्ट मध्ये कार्यरत राहतील. यामध्ये स्टॉप अँड सर्च ही मोहीम राबविण्याचे आश्वासन आयुक्त कर्णिक यांनी दिले.

या बैठकीनंतर आमदार देवयानी फरांदे यांनी गुन्हेगारी लवकरच नियंत्रणात यावी यासाठी उपाययोजना सुरू आहेत. शहरातील पोलिसांवर कोणताही राजकीय दबाव नाही. मुख्यमंत्र्यांनीही पोलीस आयुक्तांना सूचना केल्या आहेत. त्यामुळे येत्या सात दिवसात परिणाम दिसून येईल, असा दावा केला.

आधी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने प्रचंड शक्ती प्रदर्शन करीत गुन्हेगारीवर पोलिसांना धारेवर धरले होते. त्यानंतर महायुतीच्या सहकारी पक्षाच्या मंत्र्यांनी आयुक्तांची भेट घेऊन चर्चा केली. त्या पाठोपाठ भाजपचे शहरातील तिन्ही आमदार देखील सक्रिय झाले आहेत. त्यामुळे गुन्हेगारीने त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा मिळतो का? याची सगळ्यांना उत्सुकता आहे.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com