Dinesh Kumar Sharma : 'वोट जिहादच्या राजकारणाला मतांच्या क्रांतीतून उत्तर मिळेल' ; दिनेशकुमार शर्मांचा विरोधकांना इशारा!

Dinesh Kumar Sharma Vs Mahavikas Aaghadi : महाविकास आघाडी पराभव समोर दिसू लागल्याने फतवे काढून राजकारण करत आहे, असा आरोपही केला आहे.
Dinesh Kumar Sharma
Dinesh Kumar SharmaSarkarnama

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात नगर जिल्ह्यात मतदान होत आहे. मतदानाची तारीख जशी जवळ येत आहे, तशा भाजपच्या नेत्यांच्या फैऱ्या नगर जिल्ह्यात वाढल्या आहेत. उत्तरप्रदेशचे माजी उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे प्रभारी खासदार डाॅ. दिनेशकुमार शर्मा यांनी नगर जिल्ह्यातील भाजपच्या तयारीचा आढावा घेतला.

"मतांच्या तुष्टीकरणासाठी फतवे काढून कुणी राजकारण करणार असेल, तर जनता त्याला थारा देणार नाही. जनता 'वोट जिहाद'चे राजकारण झुगारून देऊन मतांची क्रांती करून राष्ट्रवादाला पाठबळ देईल", असा विश्वास दिनेशकुमार शर्मा यांनी व्यक्त केला.

खासदार डाॅ. दिनेशकुमार शर्मा यांनी नगर दक्षिण आणि शिर्डी लोकसभा मतदार संघाचा दोन दिवसीय दौरा केला. संघटनात्मक पातळीवर पदाधिकारी, कार्यकर्ते युवा वॉरियर्स यांच्याशी संवाद साधून निवडणुकीतील बारकावे त्यांनी जाणून घेतले. नगरमध्येही युवा वॉरियर्स या मेळाव्यात त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. भाजपचे(BJP) स्टार प्रचारक तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी त्यांचे स्वागत केले. माजी महापौर बाबासाहेब वाकळे यावेळी उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Dinesh Kumar Sharma
Ashok Gaikwad : '...यासाठी रामदास आठवले अन् प्रकाश आंबेडकरांनी घेतली संविधानद्रोही भूमिका' ; अशोक गायकवाडांचं विधान!

डॉ. शर्मा म्हणाले, "राज्यात महायुतीला मोठे यश मिळणार असून 2019च्या विधानसभेत राज्यातील जनतेने दिलेल्या जनादेशाचा अवमान करणाऱ्यांना चांगलाच धडा शिकवेल. विरोधकांमध्ये आता कोणताही आत्मविश्वास राहिला नाही. विरोधी आघाडीतील प्रत्येक पक्षाला आपल्या अस्तित्वासाठी झगडण्याची वेळ आली आहे. पराभव समोर दिसू लागल्याने फतवे काढून राजकारण करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. फतवे काढून 'वोट जिहाद'चे राजकारण करणे हे जनतेला मान्य नाही. समाजात सांप्रदायिकता रहावी हीच भाजपची भूमिका आहे.', असे शर्मा यांनी सांगितले.

'पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांनी प्रत्येक योजनांचा लाभ समाजातील सर्व घटकांना मिळवून देताना कधीही धर्माचा विचार करून भेद निर्माण होऊ दिला नाही. समाजातील प्रत्येक घटकांची उन्नती हाच योजना सुरू करण्यामागचा विचार आहे. पण केवळ आता मताच्या तुष्टीकरणासाठी फतवे काढले जात असतील तर सुज्ञ मतदार अशा राजकारणाला कधीही साथ देणार नाहीत. जनता राष्ट्रवादाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील. 'वोट जिहाद'च्या राजकारणाला मतांची क्रांती करून उत्तर देईल', असा इशारा डाॅ. शर्मा यांनी दिला. उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाचा विचार केव्हाच सोडून दिला आहे. त्यामुळे राज्यात सुरू झालेल्या फतव्यांच्या राजकारणाला विरोध करण्याची त्यांची हिंमत नसल्याचा टोला डॉ. शर्मा यांनी लगावला.

Dinesh Kumar Sharma
Shantigiri Maharaj News : उमेदवारी अर्ज बाद तरीही शांतिगिरी महाराज रिंगणात, नेमकं घडलं काय ?

निवडणुकीनंतर गांधी परिवार पर्यटनावर असणार-

राहुल गांधी(Rahul Gandhi) यांनी मतदारसंघ बदलावर डॉ. दिनेशकुमार शर्मा यांनी डरो मत, असे बोल होते. प्रियंका गांधी ‘मै लढती हू लढती रहुंगी’ असे देशभर सांगत होत्या. मात्र निवडणुकीत त्यांची भूमिका ही केवळ राजकीय पर्यटनाची असून निवडणुका झाल्या की त्या लगेच रोम आणि इटलीत दिसतील, अशी खोचक प्रतिक्रिया दिली.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com