Sujay Vikhe-Patil, Arun Jagtap News
Sujay Vikhe-Patil, Arun Jagtap NewsSarkarnama

Sujay Vikhe-Patil News : खासदार विखेंनी राष्ट्रवादीच्या जगतापांना ऑफर देताना साधले योग्य टायमिंग

Sujay Vikhe-Patil, Arun Jagtap News : खासदार विखेंनी दिलेल्या ऑफरची नगरच्या राजकीय वर्तुळात चांगली चर्चा रंगली आहे.
Published on

Ahmadnagar News : भारतीय जनता पक्षाचे खासदार डॉ. सुजय विखे हे त्यांच्या थेट विधानांसाठी प्रसिद्ध आहेत. आजही त्यांनी असेच विधान केले. भाजपबरोबर राज्याच्या सत्तेत असलेल्या अजित पवार गटातील आमदार फोडण्याबाबत ते बोलले, त्यामुळे सर्वांनीच कान टवकारले. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाबरोबर असलेले नगरमधील ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार अरुण जगताप यांना भाजपमध्ये येण्याची जाहीर ऑफर खासदार विखेंनी दिली. त्यांनी जगतापांना ऑफर देण्याचा योग्य टायमिंग साधल्याची चर्चा नगरच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

अरुण जगताप यांचे पुत्र संग्राम जगताप हे नगर शहराचे विद्यमान आमदार आहेत. जगताप पिता-पुत्र सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत आहेत. विखेंची ही जाहीर ऑफर अरुण जगताप यांच्या माध्यमातून आमदार संग्राम जगताप यांना होती, असे बोलले जात आहे. विखेंनी या ऑफरच्या माध्यमातून राष्ट्रवादीला (NCP) धक्का देण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते, अशी चर्चा रंगली.

Sujay Vikhe-Patil, Arun Jagtap News
Madhya Pradesh Election : निवडणुकीपूर्वी मध्य प्रदेशात काँग्रेसला धक्का; मोठा नेता भाजपच्या गळाला

नगरमध्ये शब्दगंध साहित्य परिषद आणि महापालिकेच्या वतीने आयोजित केलेल्या दोनदिवसीय 15 व्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाचा भाजपचे (BJP) खासदार विखे पाटील आणि नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संमेलनाचा समाराेप झाला. डॉ. एस. एस. दीपक, उपमहापौर गणेश भोसले, मनपा स्थायी समितीचे सभापती गणेश कवडे, माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे, प्राचार्य शिवाजीराव देवढे, शब्दगंधचे अध्यक्ष राजेंद्र उदागे, सुनील गोसावी, भगवान राऊत, विनीत पाऊलबुधे, धनंजय जाधव, बाळासाहेब पवार, बाबा अरगडे, आरिफ शेख, ज्ञानदेव पांडुळे आदी उपस्थित होते.

खासदार विखे म्हणाले, "नगर जिल्ह्याच्या उत्तरेत साहित्य चळवळ गेली अनेक वर्षे सक्रिय आहे. दक्षिणेत मात्र ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्यानंतर आमदार संग्राम जगताप साहित्य चळवळीला पाठबळ देताना दिसत आहेत. येणाऱ्या काळात जगताप ही चळवळ पुढे नेतील, अशी साहित्यिकांची अपेक्षा आहे." जगताप यांनी अचानक साहित्याकडे वळणे हा महायुतीचाच परिणाम असून, अरुणकाका तुम्ही भाजपमध्ये या, असे विखे यांनी म्हणताच उपस्थितांनी भुवया उंचावल्या.

अरुण जगताप हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. विधान परिषदेवर ते दोन टर्म आमदार होते. राष्ट्रवादीमध्ये झालेल्या फुटीनंतर जगताप यांनी अजित पवार यांना साथ दिली. खासदार विखे आणि आमदार संग्राम जगताप यांच्यातील मैत्री सर्वश्रुत आहे.

नगर शहरातील प्रश्नांवर तसेच अनेक विकासकामांच्या ठिकाणी विखे-जगताप एकत्र असतात. नगर शहरातील उड्डाणपुलाच्या उद्घाटनावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकारी यांना पालकमंत्री राधाकृष्ण विखे आणि खासदार विखे यांनी आमदार संग्राम जगताप यांची व्यासपीठावर प्राधान्याने ओळख करून दिली होती. आता खासदार विखेंनी दिलेली ही ऑफर जगताप यांच्या माध्यमातून त्यांचे पुत्र संग्राम जगताप यांना दिल्याची चर्चा रंगली आहे.

संग्राम जगताप यांचे सासरे माजी आमदार तथा अहमदनगर जिल्हा सहकारी बॅंकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले हे भाजपमध्ये आहेत. खासदार विखेंच्या राजकीय कार्यक्रमांना शिवाजी कर्डिले हे उपस्थित असतात. खासदार विखेंनी दिलेल्या ऑफरवेळी शिवाजी कर्डिलेदेखील व्यासपीठावर होते. त्यामुळे खासदार विखेंनी ऑफर देण्याचा योग्य टायमिंग साधल्याचे बोलले जात आहे.

Edited by : Amol Jaybhaye

Sujay Vikhe-Patil, Arun Jagtap News
Jammu & Kashmir Election : 370 हटवल्यानंतर काश्मीरमध्ये झालेल्या पहिल्या निवडणुकीत काँग्रेस अन् 'एनसी'चा विजय; भाजपचा सुपडा साफ

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com