NCP vs BJP : भाजपला राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव करण्यासाठी 'राष्ट्रवादीच' लागते; जयंत पाटलांचा टोला

Jayant Patil in Jalgaon : शिंदे-फडणीस सरकारच्या कारभारावर टीका
Jayant Patil
Jayant PatilSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon News : भारतीय जनता पक्षात अद्यापही विरोधकांना पराभव करण्याचे सामर्थ्य नाही. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव करण्यासाठी राष्ट्रवादीचाच माणूस शोधावा लागतो. त्या शिवाय त्यांच्याकडे पर्याय राहिलेला नाही, असा सणसणीत टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी जळगाव (Jalgaon) येथे आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) कार्यालयात बैठक आयोजित केली होती. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय पवार यांना फोडून भाजप-शिवसेना शिंदे गटाने अध्यक्षपद बहाल केले. त्यावर बोलतांना जयंत पाटील म्हणाले, "भारतीय जनता पक्षाला स्वबळावर विरोधकांना पराभूत करण्याचे सामर्थ्य नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव करण्यासाठी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा माणूस शोधावा लागतो. त्या शिवाय त्यांना कोणताही पर्याय नसतो."

Jayant Patil
Gunratrna Sadavarte news: गुणरत्न सदावर्तेंना मोठा झटका; दोन वर्षासाठी वकिलीची सनद रद्द

शिंदे गटामुळे भाजपची किमंत घसरली

राज्यातील सद्याच्या परिस्थितीबाबत बोलतांना जयंत पाटील यांनी शिवसेनेसह (Shivsena) भाजपवर टीका केली. ते म्हणाले, "राज्यात शिवसेनेतून बाहेर पडलेल्या शिंदे गटाला कोणतीही किमंत राहिली नाही. मात्र त्यासोबत आता भारतीय जनता पक्षाची (BJP) किमंत कमी झाली आहे. असंगाशी संग केल्यावर काय होते ते आता भाजपला दिसून आले आहे. आगामी निवडणूकीत जनताही त्यांना दाखवून देईल."

Jayant Patil
Bawankule On Thackeray's Statement: माझं कूळ काढून त्यांनी माझा नव्हे, तर तमाम ओबीसींचा अपमान केला !

एकनाथ शिंदे भाजपच्या प्रभावाखाली

जयंत पाटील यांनी मुख्यंमत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचाही समाचार घेतला. यासाठी त्यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या मुंबईतील पत्रकार परिषदेचे उदाहरण दिले. जयंत पाटील म्हणाले, "एकनाथ शिंदे किती प्रभावाखाली काम करीत आहेत, हे जनतेला दिसून आले आहे. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असले तरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच खऱ्या अर्थाने मुख्यमंत्रीपदाचे काम करीत आहेत हेच जनतेला दिसून आले आहे."

महाविकास आघाडी म्हणूनच लढणार

यावेळी पाटील यांनी राज्यातील आगामी निवडणुकांबाबत महाविकास आघाडीचे (MVA) धोरणही स्पष्ट केले. पाटील म्हणाले, "राज्यातील आगामी बाजार समिती तसेच पालिका, महापालिका, विधानसभा व लोकसभा निवडणुका काँग्रेस, राष्टवादी काँग्रेस, शिवसेना महाविकास आघाडी म्हणूनच लढणार आहोत."

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com