Gunratrna Sadavarte news: गुणरत्न सदावर्तेंना मोठा झटका; दोन वर्षासाठी वकिलीची सनद रद्द

Gunratrna Sadavarte Latest News : सदावर्ते यांनी वकीली करतानाच्या नियमांचं उल्लघंन केलं.
Gunratrna Sadavarte Latest News :
Gunratrna Sadavarte Latest News :Sarkarnama

Gunaratna Sadavarten's legal charter cancelled : वकील गुणरत्न सदावर्तेंना मोठा धक्का बसला आहे. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी बार काउन्सिल ऑफ इंडियाने सदावर्तेंची वकिलीची सनद दोन वर्षांसाठी रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.अॅड. सुशील मंचरकर यांनी या प्रकरणी बार काउन्सिलकडे तक्रार दाखल केली होती.त्यावर झालेल्या सुनावणीत सदावर्तेंची सनद रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.अशी माहिती अॅड. मंचरकर यांनी दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांनी काढलेल्या मोर्चाला चिथावणी दिल्याचा सदावर्तेंवर आरोप होता. सदावर्ते यांनी वकीली करतानाच्या नियमांचं उल्लघंन केलं.वकिली पेशाची ओळख असलेला काळा कोट परिधान केलेला असताना हातात पट्टी बांधून वकिली पेशाचे उल्लंघन केले. इतकेच नव्हे तर त्यांनी मराठा आरक्षण आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलना दरम्यान मीडिया समोर चुकीची वक्तव्ये केल्याचा दावा बार कौन्सिलकडे करण्यात आला होता. उच्च न्यायालयाने देखील सदावर्ते यांच्या विरोधातील शिस्तभंगाची कारवाई थांबवण्यास नकार दिला होता.

Gunratrna Sadavarte Latest News :
Bawankule News : माझं कूळ काढून त्यांनी माझा नव्हे, तर तमाम ओबीसींचा अपमान केला !

वकिलांनी वकिली करताना कसे वागावे आणि कसे मार्गदर्शन करावे याबाबत काउन्सिलने काही नियम ठरवून दिले आहेत. यातील निमय सातनुसार वकिलांना सार्वजनिक ठिकाणी आपला कोट आणि बँड घालण्यास मनाई आहे.या दोन्ही गोष्टी न्यायालयाच्या आवारात वा परिसरात किंवा न्यायालयीन कार्यक्रमातच वापरण्यास परवानगी असते. पण सदावर्तेंनी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात आझाद मैदानासह अनेक बैठकांमध्ये हजेरी लावली होती.

सदावर्तेंनी कोट आणि बँड घालूनच त्यांनी डान्स केला. त्यांचे हे वर्तन वकिली नियमांचे उल्लंघन करणारे असल्याचे मंचरकर यांनी सांगितलं. त्यानंतर या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आपण सदावर्तेंविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर बार काउन्सीलने सदावर्तेंवर शिस्तभंगाची कारवाई करत त्यांची वकीली सनद दोन वर्षांसाठी रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.अॅड. सदावर्तेंनी वकिलीच्या नियमांच्या उल्लंघनप्रकरणी अॅड. मंचरकर यांनी बार कौन्सिल ऑफ इंडियाकडे तक्रार दाखल केली होती. यात सदावर्तेंनी वकिलांसाठी बनवलेल्या नियमांचा भंग केल्याचे नमुद करण्यात आले होते.

Gunratrna Sadavarte Latest News :
Shivsena News : परभणीत राष्ट्रवादी- काॅंग्रेसला दणका, सरपंच, माजी नगरसेवकांसह शेकडो पदाधिकारी शिंदे गटात..

वकिलांचा कोट आणि बँड न्यायालयाबाहेर सार्वजनिक ठिकाणी परिधान करणे, तो घालून नाचणे,या सर्व गोष्टी सदावर्तेंनी केल्याचे या तक्रारीत नमुद करण्यात आले होते. वकिलांनी केवळ न्यायालयात काळा गाऊन घालण्याचा नियम असतानाही त्यांनी वारंवार माध्यमांसमोर व्यावसायिक गैरवर्तन केल्याचे या तक्रारीत सांगण्यात आले होते. या सर्व नियमांचे सदावर्तेंनी उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com