Supreme Court: शिंदे फडणवीस सरकार जाणार की राहणार ? सर्वोच्च न्यायालयात आज महत्वपूर्ण सुनावणी

Shinde Fadnavis Government : ठाकरे गटाची 7 न्यायमूर्तींकडे प्रकरण सोपवण्याची मागणी मान्य होते का याची उत्सुकता...
Uddhav Thackeray-Eknath Shinde
Uddhav Thackeray-Eknath ShindeSarkarnama

Shinde Fadnavis Government : महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष आणि शिवसेना नेमकी कुणाची यांसह विविध याचिकांवर महत्वपूर्ण सुनावणी सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठापुढे मंगळवारी (दि.१०) होणार आहे. सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती एम. आर. शाह, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली व न्यायमूर्ती पी.एस. नरसिंहा यांच्या घटनापीठापुढे यासंदर्भातील याचिकांवर मंगळवारी सुनावणी होणार आहे.

या सुनावणीत शिवसेना(Shivsena) नेमकी कुणाची यांसह विविध याचिकांवर निर्णय होण्याची शक्यता असल्यानं राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष या सुनावणीकडं लागलेलं आहे.

Uddhav Thackeray-Eknath Shinde
Rahul Gandhi: ''आधुनिक काळातले कौरव हाफ पँट घालतात आणि...''; राहुल गांधींनी पु्न्हा भाजप,संघाला डिवचलं

राज्यात जून महिन्यामध्ये मोठा राजकीय भूकंप घडला होता. यात शिवसेनेतील बंडखोरी उफाळून आल्यानंतर एकनाथ शिंदेंसह ४० आमदार व काही खासदारांनी उध्दव ठाकरेंच्या नेतृत्वाला आव्हान दिलं होतं. शिंदेंनी भाजपसह सत्ता स्थापन केली. तेव्हापासून शिंदे आणि ठाकरे गटांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.

एकीकडे राजकीय वातावरण तापलेलं असतानाच शिंदेंनी भाजपसह सत्ता स्थापन केल्यानंतर शिंदे गटानं शिवसेना पक्ष, चिन्ह यावर दावा ठोकला होता. तर ठाकरे गटानं १६ अपात्र आमदारांसह विविध मुद्द्यांवर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. मात्र, राज्यातील सत्ता संघर्षाची सुनावणी गेल्या ६ महिन्यांपासून लांबणीवर टाकली जात आहेत. त्यामुळे आज होणार्या सुनावणीत सत्तासंघर्षावर महत्वपूर्ण निर्णय येण्याची शक्यता आहे.

Uddhav Thackeray-Eknath Shinde
Pune : चंद्रकांतदादांच्या मतदारसंघात भाजपच्या माजी नगरसेवकाची मेट्रो पिलरवर फ्लेक्सबाजी

ठाकरे गटानं ही सुनावणी 5 ऐवजी 7 न्यायाधीशांच्या घटनापीठापुढे करावी अशी मागणी करण्यात आली आहे. महिनाभरानंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्टात सुनावणीसाठी येत आहे. सुप्रीम कोर्टाच्या आजच्या कामकाजात सकाळी साडेदहा वाजता त्यावर सुनावणी होणार आहे. ठाकरे गटाची 7 न्यायमूर्तींकडे प्रकरण सोपवण्याची मागणी मान्य होते का याची उत्सुकता आहे.

शिवसेना नेमकी कुणाची? निवडणूक आयोगासमोर महत्वपूर्ण सुनावणी

राज्यातील सत्तासंघर्षानंतर उद्भवलेल्या शिवसेना नेमकी कुणाची ठाकरेंची की शिंदेंची ? याविषयी दोन्ही गटाकडून दाखल करण्यात आलेल्या शिवसेना पक्ष व धनुष्यबाण चिन्ह याबाबत महत्वपूर्ण सुनावणी निवडणूक आयोगासमोर मंगळवारी दुपारी तीन वाजता ही सुनावणी होणार आहे. यात शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत निर्णय दिला जाण्याची शक्यता आहे.

अॅड. असिम सरोदे यांनी महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर टि्वट केलं आहे. ते आपल्या ट्वीमध्ये म्हटले की, ''महाराष्ट्र सत्ता संघर्ष-उद्या 9 न्यायाधीशांचे घटनापीठ नेमले जाण्याची मोठी शक्यता आहे, माझ्या मतानुसार 9 जणांचे घटनापीठ ही कायदेशीर आवश्यकता आहे. नवीन घटनापीठात कोण असेल हे ठरविण्याचे संपूर्ण अधिकार सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांना असतील व संविधान मानणारे लोक राज्याचे भवितव्य ठरवतील'' अशी शक्यता सरोदे यांनी व्यक्त केली आहे.

तसेच आपल्या दुसऱ्या ट्वीटमध्ये ते म्हणाले ''महाराष्ट्रातील आताच्या सरकारबद्दल अंतिम निर्णय जास्तीजास्त 15 फेब्रुवारी 2023 पर्यंत लागेल. सध्याचे सरकार स्पष्टपणे बेकायदेशीर व घटनाबाह्य आहे'' असे माझे ठाम कायदेशीर मत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com