Nashik ZP : दादांच्या राष्ट्रवादीला रोखण्यासाठीच कोकाटेंच्या तालुक्यात भाजपचे ऑपरेशन लोटस, आतापर्यंत दोन तगडे मोहरे गळाला

Sinnar Taluka BJP Politics : मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या सिन्नर तालुक्यात भाजपने शिरकाव केला आहे. आतापर्यंत दोन तगडे मोहरे भाजपच्या गळाला लागले आहेत.
Ajit Pawar, Manikrao Kokate
Ajit Pawar, Manikrao KokateSarkarnama
Published on
Updated on

Nashik News : नाशिक जिल्ह्यात पंधरापैकी अर्धे म्हणजे सात आमदार एकट्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे ग्रामीण नेटवर्क स्ट्रॉंग असून याचा फायदा जिल्हापरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला होणार आहे. नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादीचं पारडं जड असल्याने इतर पक्षांना राष्ट्रवादीला थोपवणे अवघड आहे.

परंतु आता राष्ट्रवादीला रोखण्यासाठी भाजपने आपल्या हालचाली गतिमान केल्याचे दिसत आहे. महापालिका निवडणुकीत भाजपने फार आधीच शंभर प्लसचा नारा दिला आहे. त्यादृष्टीने पुरेसे इनकमिंग भाजपमध्ये झाले आहे. त्यामुळे भाजपने आपला मोर्चा आता जिल्हा परिषद निवडणुकीकडे वळवला आहे.

त्यासाठी भाजपने राष्ट्रवादीचे मंत्री माणिकराव कोकाटे यांचा मतदारसंघ असलेल्या सिन्नर तालुक्यात शिरकाव केला आहे. कारण कोकाटे यांच्यामुळे सिन्नर तालुक्यात राष्ट्रवादीचा मोठा प्रभाव आहे. सिन्नर तालुका आता नाशिक जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू आहे. कारण कोकाटे यांच्या व्यतिरिक्त नाशिकचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार राजाभाऊ वाजे हेही सिन्नर तालुक्यातील आहे. एक मंत्री व एक खासदार सिन्नर तालुक्याचा आहे.

Ajit Pawar, Manikrao Kokate
Nashik Congress : हर्षवर्धन सपकाळांचा संघटनात्मक बॉम्ब ! काँग्रेसने नाशिक दोन तुकड्यांत विभागले

याच सिन्नरमध्ये भाजपने आता आपली ताकद वाढवायला सुरुवात केली आहे. त्यासाठी भाजपने पहिला डाव कोकाटे यांच्या कुटुंबातच टाकला. कोकाटे यांचे बंधू भारत कोकाटे यांनी आता भाजपत प्रवेश केला आहे. त्यामुळे साहजिकच त्याचा तोटा माणिकराव कोकाटे यांच्या गटाला होणार आहे. भारत कोकाटे हे माणिकराव कोकाटे यांच्या कन्या सिमंतिनी कोकाटे यांच्या राजकीय प्रवासात अडसर ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

तर दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे युवानेते उदय सांगळे यांनाही भाजपने गळाला लावले आहे. त्यांचाही भाजप प्रवेश निश्चित झाला आहे. सोमवारी (दि. ३) भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांचा भाजपत प्रवेश ठरला आहे. उदय सांगळे यांच्या पत्नी शीतल सांगळे या यापूर्वी जिल्हापरिषदेच्या अध्यक्ष राहिल्या आहेत. त्यामुळे उदय सांगळे यांचा तालुक्यातील प्रभाव पाहाता भाजप जिल्हा परिषद निवडणुक डोळ्यासमोर ठेऊन त्यांना पक्षात घेत आहे.

Ajit Pawar, Manikrao Kokate
Kokate Rummy Video : कोकाटे रमी व्हिडीओ प्रकरणाचा तपास अजून अपूर्ण, अहवाल देण्यास पोलिसांनी मागितली चार दिवसांची मुदत

भारत कोकाटे व उदय सांगळे या दोघांचा भाजप प्रवेश आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला फायद्याचा ठरणार आहे. राष्ट्रवादीला रोखण्यासाठी भाजपने केलेली ही खेळी असल्याचे बोलले जात आहे. जिल्हा परिषद निवडणुक डोळ्यासमोर ठेऊन भाजपने आता आपली ताकद वाढवण्यासाठी अन्य पक्षातील ग्रामीण राजकारणात प्रभाव असणारे मोहरे गळाला लावण्याचे काम सुरु केले आहे.

इतकच नाही तर दिंडोरी-पेठ विधानसभा मतदारसंघातही भाजपच्या ऑपरेशन लोटसला यश आलं आहे. माजी आमदार रामदास चारोस्कर व माजी समाजकल्याण सभापती सुनीता चारोस्कर यांच्या भाजप पक्षप्रवेशाचा मुहूर्त निश्चित केला आहे. येत्या ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता, संस्कृती लॉन्स, दिंडोरी येथे हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com