भुसावळ पालिकेवर आजपासून भाजप आऊट, प्रशासक इन!

निवडणुकीसाठी इच्छुकांच्या राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत.
Bhusawal municipal council building 

Bhusawal municipal council building 

Sarkarnama

Published on
Updated on

भुसावळ : भुसावळ नगरपालिकेवर आजपासून राज्य शासनाने (Maharashtra Government) प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रांताधिकारी रामसिंग सुलाने प्रशासक (Administrator) म्हणून कामकाज पाहतील. ४८ सदस्यांच्या या पालिकेत २०१६ मध्ये भाजपला बहुमत मिळाले व लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे यांनी पदभार स्वीकारला होता. त्यामुळे आजपासून भाजप (BJP) आऊट आणि प्रशासक इन अशी स्थिती असेल.

<div class="paragraphs"><p>Bhusawal municipal council building&nbsp;</p></div>
संजय राऊतांचा नाशिक दौरा फलदायी... सेनेत इनकमिंग सुरू...

भुसावळ नगरपालिका ब्रिटिशकालीन असुन ती १८८२ मध्ये स्थापन झाली आहे. पालिकेवर पूर्वी रेल्वेचे डीआरएम हेच मुख्याधिकारी म्हणून कामकाज पाहत होते. १३९ वर्षांची वाटचाल असणाऱ्या व सद्य:स्थितीत २४ प्रभागांच्या ४८ नगरसेवक संख्या असणाऱ्या नगरसेवकांचा कार्यकाळ बुधवारी संपला आहे.

<div class="paragraphs"><p>Bhusawal municipal council building&nbsp;</p></div>
मुनगंटीवारांनी नाव बदलावे, कारण सरकार बरखास्त होत नाही!

भुसावळ पालिकेची पंचवार्षिक निवडणूक २७ नोव्हेंबर २०१६ ला झाली होती. पालिकेची अखेरची सर्वसाधारण सभा सोमवारी (ता. २७) झाली. या सभेत २६३ विषयांना मंजुरी मिळाली. विद्यमान सदस्यांच्या कार्यकाळातील ती शेवटची सभा होती. गेल्या २१ महिन्यांपासून कोरोनाचा असलेला विळखा, आता नव्या ओमिक्रॉनच्या रूपाने घट्ट होऊ लागल्याने पालिका निवडणुकीची चिन्हे सध्या तरी धूसर झाली आहेत. गेल्या दोन वर्षांत सहकारी संस्था व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोरोनामुळे पुढे ढकलल्या गेल्या आहेत. पालिकेची मुदत बुधवारी संपली असली तरी निवडणुकीच्या हालचाली सध्या तरी दिसत नाहीत.

लोकसंख्येत सरासरी १७ टक्के वाढ गृहीत धरून प्रभागरचनेचा कच्चा आराखडा निवडणूक आयोगाला सादर करण्यात येणार आहे. गत निवडणुकीतील आराखडा, सोबतच होऊ घातलेल्या रणधुमाळीसाठीचा कच्चा आराखडा तयार करण्यात येणार आहे. २०११ च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या एक लाख ८७ हजार ४२१ इतकी असून, यात १७ टक्के वाढ गृहीत धरण्याचे शासनाचे निर्देश दिले आहेत.

द्विसदस्यीय पद्धत कायम

लोकसंख्येतील वाढ लक्षात घेता कच्च्या आराखड्यात एक प्रभाग वाढवून प्रभागसंख्या २५ असेल यामुळे सदस्यसंख्याही ४८ वरून ५० होऊ शकते, असे कच्च्या आराखड्यात प्रस्तावित करण्यात आले आहे. गत निवडणूक २४ प्रभागांमध्ये झाली होती. प्रभागातील द्विसदस्यीय पद्धत गत निवडणुकीप्रमाणेच कायम ठेवली आहे.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com