संजय राऊतांचा नाशिक दौरा फलदायी... सेनेत इनकमिंग सुरू...

माजी महापौर दशरथ पाटील पुत्राच्या माध्यमातून स्वगृही शिवसेनेत
Prem Dashrath patil joins Shivsena

Prem Dashrath patil joins Shivsena

Sarkarnama

Published on
Updated on

नाशिक : माजी महापौर दशरथ पाटील यांचे पुत्र प्रेम यांनी आज शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay raut) यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. आगामी महापालिका (NMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत इनकमींग सुरु झाल्याचे हे संकेत शिवसेनेला लाभदायी ठरण्याची चिन्हे आहेत.

<div class="paragraphs"><p>Prem Dashrath patil joins Shivsena</p></div>
मुनगंटीवारांनी नाव बदलावे, कारण सरकार बरखास्त होत नाही!

आज जिल्हा शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या कार्यक्रमात श्री. पाटील यांनी खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. यावेळी संपर्क नेते भाऊसाहेब चौधरी, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, दत्ता गायकवाड, अजय बोरस्ते, नगरसेवक विलास शिंदे यांसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

प्रेम हे माजी महापौर दशरथ पाटील यांचे ते पुत्र होत. दशरथ पाटील शिवसेनेचे महापौर होते. त्यांनी २००९ मध्ये शिवसेनेतर्फे नाशिक लोकसभेची निवडणूक लढविली होती. त्यात त्यांचा अतिशय अल्प मातांनी पराभव झाला होता. यावेळी शिवसेनेतील एक गट त्यांच्याबरोबर नव्हता अशी चर्चा होती. त्यातूनच त्यांचा निसटता पराभव झाला होता.

<div class="paragraphs"><p>Prem Dashrath patil joins Shivsena</p></div>
कवीच्या अंत्यसंस्कारावेळी रिपब्लिकन, काँग्रेस कार्यकर्त्यांत धुमश्चक्री

त्यानंतरच्या महापालिका निवडणुकीत त्यांना शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. त्यानंतर त्यांनी काही काळ काँग्रेस पक्षातही घालवला. त्यानंतर त्यांनी काँग्रेसला राम राम ठोकला. सध्या ते कोणत्याच पक्षात नव्हते. आज त्यांच्या मुलाने शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे यानिमित्ताने एका तपाने दशरथ पाटील शिवसेनेच्या संपर्कात आले आहेत.

शिवाजीनगरला पुन्हा भाऊबंदकी

शिवाजीनगर (सातपूर) हा प्रभाग पाटील यांचा गृहप्रभाग आहे. येथे महापालिकेच्या १९९२ मध्ये झालेल्या पहिल्या निवडणुकीपासून माजी महापौर दशरथ पाटील आणि सध्या भाजपमध्ये असलेल्या व माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांच्यातील राजकीय भाऊबंदकीचा प्रभाग राहिलेला आहे. प्रभागातील निवडणुकीत तेच उमेदवार राहिलेले आहेत. गेल्या दोन निवडणूकात त्याला विराम होता. यंदा पुन्हा दुसऱ्या पिढीतील राजकीय संघर्ष पुन्हा दिसण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुक रंगण्याची चिन्हे आहेत.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com