BJP Politics: Loksabha Impact, आघाडीकडे गमावण्यासारखं काहीच नाही, भाजप, अजित पवारांना जागा राखण्याचे आव्हान!

Political Landscape North Maharashtra: उत्तर महाराष्ट्रात भाजप आणि अजित पवार गटाकडे सर्वाधिक जागा असल्याने महाविकास आघाडीकडे गमावण्यासारखे काही नाही.
Girish Mahajan, Dada Bhuse & Dr Vijaykumar Gavit
Girish Mahajan, Dada Bhuse & Dr Vijaykumar GavitSarkarnama
Published on
Updated on

North Maharashtra: विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. उत्तर महाराष्ट्रात यंदा महायुती आणि महाविकास आघाडीत अतिशय मोठी चुरस आहे. अनेक जण पक्षांतराच्या विवंचनेत असल्याने निवडणुकीपूर्वी मोठ्या घडामोडींचे संकेत आहेत.

खानदेश अर्थात उत्तर महाराष्ट्रात विधानसभेचे ३५ जागा आहेत. यामध्ये सर्वाधिक १३ आमदार भाजपचे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे ७ आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडे ६ अशा २६ जागा महायुतीकडे आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुका आणि त्यानंतर बदललेल्या राजकारणामुळे महायुतीला या जागा राखण्याचे मोठे आव्हान यंदाच्या निवडणुकीत जाणवते आहे.

उत्तर महाराष्ट्रातील सर्वाधिक १५ जागा नाशिक जिल्ह्यात आहेत. सध्या यातील "एमआयएम" चे मौलाना मुफ्ती (मालेगाव शहर) आणि काँग्रेसचे हिरामण खोसकर (इगतपुरी) वगळता उर्वरित सर्व तेरा आमदार महायुती सरकारचे घटक आहेत.

उत्तर महाराष्ट्रात दोन अपक्ष देखील महायुती बरोबरच आहेत. `एमआयएम`चे दोन्ही आमदारांनी विधानपरिषद आणि राज्यसभेच्या निवडणुकीत या आमदारांनी महायुतीला मदत होईल अशीच भूमिका घेतलेली होती. एकंदरच 35 आमदारांपैकी 30 आमदार महायुती सरकार बरोबर असल्याने उत्तर महाराष्ट्रात सरकारची स्थिती भक्कम होती.

Girish Mahajan, Dada Bhuse & Dr Vijaykumar Gavit
Ramdas Athawale : 'वाट्याला येणाऱ्या जागांमध्ये तडजोड नाही'; आठवले म्हणाले, 'राज ठाकरेंची लढाई...'

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जळगाव जिल्ह्यातील रावेर आणि जळगाव या दोन्ही मतदारसंघातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपने आघाडी घेतली होती. मात्र धुळे नंदुरबार आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये वेगळी स्थिती राहिली. नाशिक जिल्ह्यात महायुतीच्या ताब्यात असलेल्या नऊ विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने मताधिक्य मिळविले.

या स्थितीत लोकसभेचा कल कायम राहिल्यास धुळे जिल्ह्यातील दोन, नंदुरबार जिल्ह्यातील चार आणि नाशिक जिल्ह्यातील नऊ अशा पंधरा जागांवर महाविकास आघाडी महायुतीला मोठे आव्हान देण्याच्या स्थितीत आहे.

यामध्ये भारतीय जनता पक्षाला सगळ्यात मोठा फटका बसू शकतो. या पक्षाचे सध्या सर्वाधिक 13 आमदार आहेत यातील अनेक प्रस्थापित आमदारांना स्थानिक पातळीवर आव्हान दिले जात आहे. यामध्ये जळगाव जिल्ह्याचे नेतृत्व करणारे मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर विधानसभा मतदार संघातील सर्वे देखील प्रतिकूल असल्याचे बोलले जाते.

विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीत 26 जागांवर महायुतीने आघाडी घेतली होती. लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक फटका राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला बसण्याची शक्यता आहे. या पक्षाचे सात आमदार आहेत. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील एकमेव जागा वगळता उर्वरित सर्व सहा आमदार नाशिक जिल्ह्यातील आहेत.

नाशिकच्या सर्वच्या सर्व सहा विधानसभा मतदारघांमध्ये लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने मताधिक्य मिग्रेसचेळविले आहे. हे मताधिक्य देखील लक्षणीय आहे. आता विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. सध्या तरी इच्छुकांची धावपळ आणि प्रस्थापित आमदारांची तयारी पाहता लोकसभा निवडणुकीतील कल कायम राहिल्यास महायुतीला खूप परिश्रम घ्यावे लागतील, अशी स्थिती आहे.

काँग्रेसचे आमदार

सध्याच्या स्थितीत काँग्रेसचे पाच आमदार आहेत. यामध्ये के. सी. पाडवी (अक्कलकुवा), शिरीषकुमार नाईक (नवापूर), कुणाल पाटील (धुळे ग्रामीण), शिरीष चौधरी (रावेर) आणि हिरामण खोसकर (इगतपुरी) यांचा समावेश आहे. यातील खोसकर यांनी नुकताच अजित पवार गटात प्रवेश केला आहे.

भाजपचे आमदार

भाजपने उत्तर महाराष्ट्रात आपल्या दबदबा निर्माण केला आहे. राजेश पाडवी (शहादा), विजयकुमार गावित (नंदुरबार), जयकुमार रावल (शिंदखेडा), काशीराम पावरा (शिरपूर), संजय सावकारे (भुसावळ), सुरेश भोळे (जळगाव शहर), मंगेश चव्हाण (चाळीसगाव), गिरीश महाजन (जामनेर), दिलीप बोरसे (बागलाण), राहुल आहेर (चांदवड), राहुल ढिकले (नाशिक पूर्व), देवयानी फरांदे (नाशिक मध्य), सीमा हिरे (नाशिक पश्चिम) असे तेरा आमदार भाजपचे आहेत.

शिवसेना विरूद्ध शिवसेना

शिवसेना उद्धव ठाकरे गटात फुट पडली. यामध्ये सर्व आमदार मुख्यमंत्री शिंदे गटात दाखल झाले. यामध्ये दादा भुसे (मालेगाव बाह्य), सुहास कांदे (नांदगाव), लताबाई सोनवणे (चोपडा), गुलाबराव पाटील (जळगाव ग्रामीण), चिमणराव पाटील (एरंडोल) आणि किशोर पाटील (पाचोरा) यांचा समावेश आहे.

अजित पवार गटासाठी संघर्ष

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे छगन भुजबळ (येवला), माणिकराव कोकाटे (सिन्नर0, दिलीप बनकर (निफाड), नरहरी झिरवाळ (दिंडोरी), सरोज अहिरे (देवळाली), अनिल पाटील (अमळनेर) असे सात आमदार आहेत. महायुतीच्या या प्रस्थापित आमदारांमध्ये बहुतांश जागांवर संघर्ष करावा लागेल, अशी स्थिती आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com