Ahilyanagar News : लोकसभा निवडणुकीत एकही जागा मिळाली नसलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाने आता विधानसभेसाठी जागा लढवण्याचे निश्चित केलं आहे. विधानसभेच्या जागांचा प्रस्ताव महायुतीकडे पाठवला असून, यात कोणतीही तडजोड करणार नसल्याचा इशारा दिला.
तसंच राज ठाकरे विधानसभेच्या सगळ्या जागा लढणार असल्याने त्याचा फायदा महायुतीलाच होईल आणि तिसऱ्या आघाडीला मतं मिळणार नाहीत, असा दावा देखील आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिला.
आरपीआयचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले शिर्डी दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी महायुती विधानसभा निवडणुकांना (Election) समोरे कसे जाईल, याची अप्रत्यक्षरित्या माहिती दिली. महायुतीत आरपीआय किती जागा लढवणार आणि त्यात कोणतीही तडजोड करणार नसल्याचे ठामपणे सांगितले.
रामदास आठवले म्हणाले, महायुतीकडे (Mahayuti) आरपीआयसाठी आठ जागा मागितल्या आहेत. या अहिल्यानगरमधील श्रीरामपूरमधील जागा महत्त्वाची आहे. यात कोणतीही तडजोड करणार नाही. लोकसभा निवडणुकील ज्या चुका झाल्या, त्या पुन्हा विधानसभा निवडणुकीला होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. महायुती सरकारने विकास कामे केली असल्याने विजय पक्का आहे. राज्यात महायुतीच्या 170 पेक्षा अधिक जागा जिंकतील, असेही रामदास आठवले यांनी दावा केला.
राज ठाकरे राज्यात विधानसभा निवडणुकीला स्वतंत्रपणे सामोरे जात आहे. यावर रामदास आठवले म्हणाले, "राज ठाकरेंनी लोकसभेला पाठिंबा दिला होता. त्याचा काही फायदा झाला नाही. उलट नुकसान झाले. आता ते विधानसभेला एकटेच समोरे जात आहे. त्यांच्या सभेला गर्दी होते, पण मत पडत नाहीत". आता ते एकटेच लढत असल्याने, त्याचा सर्वाधिक फायदा महायुतीला होईल, असा दावा देखील रामदास आठवले यांनी केला.
तिसऱ्या आघाडीवर बोलताना रामदास आठवले म्हणाले, "राज्यात बच्चू कडू यांच्या तिसऱ्या आघाडीला मते मिळणार आहे. 'वंचित'चे प्रकाश आंबेडकर यांना लोकसभेपेक्षा यावेळी कमी मते पडतील. तसंच मराठा आरक्षणाचा कसलाही फटका महायुती बसणार नाही".
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.