
✅ 3-पॉइंट सारांश (Summary):
भाजप आमदारांत मतभेद: नंदुरबार जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसंदर्भात भाजपचे दोन आमदार स्वबळ बनाम महायुती अशा विरोधी भूमिकेत आहेत.
डॉ. गावित यांचा स्वबळाचा आग्रह: आमदार विजयकुमार गावित यांनी महायुतीतील इतर पक्षांनी भाजपच्या विरोधात काम केल्याचा आरोप करत स्वबळावर निवडणूक लढवण्याची मागणी केली.
पाडवींची पक्षनिष्ठ भूमिका: आमदार राजेश पाडवी यांनी पक्ष आदेशानुसार निवडणुका महायुती म्हणूनच लढवाव्यात, असे सांगून गावित यांच्या भूमिकेशी असहमती दर्शवली.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वीच नंदुरबार जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले आहे. महायुतीत मोठा भाऊ असलेल्या घटक पक्ष भाजपच्या दोन आमदारांमध्ये 'स्थानिक'निवडणूक स्वबळावर लढवायची की महायुतीत यावरुन जुंपली आहे.
नंदुरबार जिल्ह्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका महायूती म्हणून लढण्यावरुन भाजपमध्येच मतभेद दिसत आहेत. भाजपाचे आमदार माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे, तर दुसरीकडे भाजपचे आमदार राजेश पाडवी मात्र महायूतीच्या आदेशाप्रमाणे महायूती म्हणूनच स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका लढवण्याचे भाष्य केले आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसने थेट विरोधाची भुमिका घेत भाजपच्या विरोधात काम केले. वरिष्ठांनी कान उघडणी करुनही या दोन्ही पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी विरोधात काम केल्याने त्यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा आणि पुढील निवडणूका खेळीमेळीच्या वातावरणात कशा निवडणूका होणार असा प्रश्न आमदार विजयकुमार गावित यांनी उपस्थित केला आहे. स्वबळावर लढण्यासाठी पक्षश्रेष्ठींना साकडे घालणार असल्याचे गावित यांनी सांगितले.
आमदार राजेश पाडवी यांनी मात्र वरिष्ठांच्या आदेशाने महायूती म्हणून निवडणुका लढवल्या जातील, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे एकाच दिवसात एकाच पक्षाचा दोन्ही आमदारांचे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर एकमेकांच्या विरोधात केलेले भाष्य बरेच काही सांगून जात आहे.
आगामी काळात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या पक्ष आदेशाप्रमाणे महायुती म्हणूनच लढविणार ज्या ठिकाणी पक्ष आदेश करेल त्या ठिकाणी त्या पद्धतीने निवडणूक लढवली जाईल, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे शहादा तळोदा मतदार संघाचे आमदार राजेश पाडवी यांनी व्यक्त केली आहे. नंदुरबार शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे एका कार्यक्रमादरम्यान प्रसार माध्यमांशी ते बोलत होते.
✅ 4 FAQs with One-Line Answers:
Q1. नंदुरबारमध्ये भाजपमध्ये कोणत्या मुद्द्यावर मतभेद झाले आहेत?
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढवाव्या की महायुती म्हणून, यावर भाजप आमदारांमध्ये मतभेद आहेत.
Q2. आमदार विजयकुमार गावित काय म्हणाले?
ते महायुतीतील इतर पक्षांवर विश्वास नसल्याचे सांगून स्वबळावर निवडणूक लढवण्याचा आग्रह धरत आहेत.
Q3. आमदार राजेश पाडवींची भूमिका काय आहे?
पाडवी यांनी पक्षाच्या निर्णयाप्रमाणे महायुती म्हणून निवडणूक लढवण्याचे समर्थन केले आहे.
Q4. भाजपमध्ये हे मतभेद कोणत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उभे राहिले आहेत?
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे मतभेद उभे राहिले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.