Prithviraj Chavan: विजनवासात गेलेले पृथ्वीराज चव्हाण शिवसैनिकांमुळे पुन्हा चर्चेत; शिवसेनेचा मुंबईत आक्रमक मोर्चा

Congress shouldn’t allow BJP to usurp saffron colour, says Prithviraj Chavan:विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसच्या नेतृत्वावर टीका केली होती. त्यानंतर चव्हाण हे सार्वजनिक कार्यक्रमात कधीतरी दिसत होते, एका अर्थानं ते विजनवासात गेले असल्याची चर्चा होती
Prithviraj Chavan
Prithviraj ChavanSarkarnama
Published on
Updated on

✅ 3-पॉइंट सारांश (Summary):

  1. पृथ्वीराज चव्हाणांच्या विधानावरून वाद: मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निकालावर प्रतिक्रिया देताना त्यांनी "भगवा" ऐवजी "हिंदू दहशतवाद" हा शब्द वापरण्याची भूमिका घेतली.

  2. शिवसेनेचा आक्रोश: शिवसेनेने या विधानाचा तीव्र विरोध करत चव्हाण यांच्यावर हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप केला व मुंबईत तीव्र आंदोलन छेडले.

  3. राजकीय पुनरागमन: विधानसभा पराभवानंतर विजनवासात गेलेले चव्हाण या वादग्रस्त विधानामुळे पुन्हा चर्चेत आले आहेत.

Mumbai News, 2 August 2025: 'भगवा दहशतवाद ऐवजी हिंदू दहशतवाद म्हटलं पाहिजे,' असे विधान करणारे राज्याचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण सध्या शिवसेनेच्या रडारवर आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा सपाटून पराभव झाला होता, त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण हे विजनवासात गेले होते. पण चव्हाण यांनी केलेल्या विधानामुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत. त्याला कारण ठरलं ते म्हणजे त्यांच्याविरोधात मुंबईत निघालेला शिवसैनिकांचा मोर्चा.

विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसच्या नेतृत्वावर टीका केली होती. त्यानंतर चव्हाण हे सार्वजनिक कार्यक्रमात कधीतरी दिसत होते, एका अर्थानं ते विजनवासात गेले असल्याची चर्चा होती. मालेगाव बॅाम्बस्फोटावरील निकालावर त्यांनी केलेल्या विधानमुळे विजनवासात गेलेले चव्हाण हे पुन्हा 'प्रकाशझोतात' आले आहेत.

चव्हाण यांनी केलेल्या विधानामुळे हिंदूंची मने दुखावली गेली असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. हा सनातन धर्माचा अपमान असल्याचे शिवसैनिकांचे म्हणणं आहे. चव्हाण यांच्याविरोधात मुंबईत टिळक भवनासमोर शिवसैनिक आक्रमक झाले आहे असून चव्हाणाची माफी मागावी, यासाठी ते अडून बसले आहेत. त्यांच्याविरोधात आंदोलन सुरु आहे.

Prithviraj Chavan
Karnataka Lokayukta Raid: 15 हजार रुपयांची सॅलरी असलेल्या क्लार्ककडे आढळले 24 घरं, 4 आलिशान कार अन् सोन्या-चांदीचं घबाड

2028 मध्ये मालेगावात झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल नुकताच लागला आहे. त्यावर चव्हाणांनी प्रतिक्रिया दिली होती. त्या विधानवरुन शिवसैनिकांनी त्यांना घेरलं आहे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणावर चव्हाण म्हणाले होते की कोणीतरी हा बॅाम्बस्फोट केला. मला हा निकाल‌ अपेक्षित होता. कारण तपासातून आलेले प्रतिकूल पुरावे, साक्षीदार यामुळे तपास अपुरा राहिला, असे मत पृथ्वाराज चव्हाण यांनी व्यक्त केले होतं.

काय म्हणाले होते चव्हाण

मालेगावच्या निकालावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘आतंकवाद भगवा न कभी था, ना है, ना कभी रहेगा’ असे टि्वट केले होते. त्यावरही बोलताना भगवा हा शब्द वापरू नका. भगवा हा आमच्यासाठी महत्त्वाचा रंग आहे. तो महाराजांचा ज्ञानेश्वरीचा रंग आहे. सनातनी दहशतवाद म्हणा. दहशतवादाला धर्म नसतो, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं होतं.

✅ 4 FAQs with One-Line Answers:

Q1. पृथ्वीराज चव्हाणांच्या कोणत्या विधानावरून वाद निर्माण झाला?
"भगवा दहशतवाद" ऐवजी "हिंदू दहशतवाद" म्हटलं पाहिजे, या विधानावरून वाद निर्माण झाला.

Q2. शिवसेनेने काय प्रतिक्रिया दिली?
शिवसेनेने चव्हाण यांच्यावर सनातन धर्माचा अपमान केल्याचा आरोप करत मुंबईत आंदोलन केलं.

Q3. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात चव्हाण काय म्हणाले?
चव्हाण यांनी तपास अपुरा राहिला होता आणि निकाल अपेक्षित होता, असे सांगितले.

Q4. देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर काय प्रतिक्रिया दिली?
फडणवीस यांनी "आतंकवाद भगवा न कभी था, ना है, ना कभी रहेगा" असे ट्विट करून प्रतिक्रिया दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com