Radhakrishna Vikhe : सावत्र भावांना वेळीच ओळखा, नाहीतर...; मंत्री विखेंनी कोणाला केलं सावध

Radhakrishna Vikhe criticism of Mahavikas Aghadi : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा प्रारंभ करताना, भाजप नेते महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. लाडक्या बहिणींना सावत्र भावाच्या वागणुकीवर सावध केले.
Radhakrishna Vikhe
Radhakrishna VikheSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : भाजप नेते महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या उपस्थित अहमदनगर जिल्ह्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा प्रारंभ झाला. मंत्री विखे यांनी यावेळी महाविकास आघाडीचा सावत्र भाऊ, असा उल्लेख करत सडकून टीका केली.

"महायुती सरकार घोषणा करणारे नव्हे, तर अंमलबजावणी करणारे सरकार आहे. आम्हीज जनतेसाठी काम करतो. पण ज्यांना काहीच करता आले नाही, ते फक्त विरोध करतात. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा विरोध करणाऱ्या सावत्र भावांना वेळीच ओळखा, त्यांच्यापासून सावध राहा", असा सल्ला मंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिला.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा प्रारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार (Ajit Pawar), महिला बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. मंत्री राधाकृष्ण विखे या कार्यक्रमात दूरदृष्य प्रणालीने सहभागी झाले. जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ,जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग उपस्थित होते. तसंच यावेळी अहमदनगरमधील महिला बचत गटांना अनुदानाच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले.

Radhakrishna Vikhe
Jai Pawar : जय पवारांनी धमाल उडवून दिली, रोहित पवारांच्या बालेकिल्ल्यात येत भाजप...

भाजपचे (BJP) मंत्री विखे म्हणाले, "योजनेला विरोध करणारे सावत्र भाऊ आता ओळखा. महायुती सरकारने सर्व बहिणीच्या अर्थिक उत्कर्षा करीता योजना सुरू आहे. केवळ घोषणा नाही, तर अंमलबजावणी झाल्याने खात्यात पैसे जमा होत, असल्याचे सांगून आधारकार्ड लिंक झाल्यानंतर उर्वरीत खात्यात पैसे जमा होतील".राज्य सरकारने महिलांसाठी अनेक योजना सुरू केल्या असून, बस भाड्यामध्ये 50 टक्के सवलत विद्यार्थ्यांनीना मोफत शिक्षण तीर्थदर्शन योजना आणि बचत गटाच्या माध्यमातून अनुदान देण्याचे काम सुरू आहे. जनतेच्या मनातील सरकार असल्याचे मंत्री विखे यांनी आवर्जून सांगितले.

Radhakrishna Vikhe
Nilesh Lanke Vs Radhakrishna Vikhe : पवारांचे वाक्य झोंबले, मंत्री विखेंनी प्रत्युत्तर दिले; खासदार लंकेंनी वाटोळे, घोटाळे सर्वच...

मंत्री विखेंना महिलांना बांधली राखी

अहमदनगर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक यांनी केलेल्या चांगल्या कामामुळे 7 लाख महिलांचे अर्ज मंजूर होवू झाले. ही योजना पुढेही चालू राहाणार असल्याने योजनेचे हप्ते खात्यात जमा होतील, असे उपस्थित महिलांना मंत्री विखे यांनी सांगितले. यावेळी महिलांनी मंत्री विखे यांना राखी बांधून योजनेचा आनंद साजरा केला.

अहिल्यादेवींचे स्मारक आणि ज्ञानेश्वर सृष्टीचा प्रकल्प

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे जन्मदिनाच्या त्रिशताब्दी वर्षाचे औचित्य साधून स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या धर्तीवर भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी घेतला. याबाबतची कार्यवाही सुरू झाली असून प्रकल्पाचा आराखडा तसेच स्मारकासाठी शहरात जागा निश्चित करण्याचे काम प्रशासकीय स्तरावर अंतिम टप्प्यात आहे. अहिल्यादेवी होळकर आणि नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिर परिसराच्या विकासाच्या आराखड्याचे सादरीकरण मंत्री विखे यांच्या उपस्थितीत झाले. जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com