Maratha Rservation Issue : मराठा आरक्षणाचा प्रश्न सत्ताधारी व विरोधकांनी एकत्र येऊन सोडवायला हवा. शिंदे-फडणवीस सरकार योग्य पद्धतीने काम करून मराठा समाजाला न्याय मिळवून देतील, असा विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. (Eknath Shinde, Fadanvis Government will give justice to Maratha community)
मराठा (Maratha) आरक्षणाची पुनर्विचार याचिका फेटाळल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी तातडीने बोलावलेल्या बैठकीतून मराठा समाजाबाबत सरकारची (Maharashtra Government) आत्मियता दिसून येत, असेही त्यांनी नमुद केले.
श्री बावनकुळे म्हणाले, मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने राज्य शासनाची पुनर्विचार याचिका फेटाळली असली तरी मराठा आरक्षणाचे दरवाजे अजिबात बंद झालेले नाहीत.
राज्य शासन हे आरक्षण मिळवून देण्यासाठी ठाम असून अधिक मजबूत कायदेशीर लढा लढण्यात येईल. यासाठी उपचारात्मक याचिका (क्युरेटिव्ह याचिका) दाखल करण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
मराठा आरक्षणाची पुनर्विचार याचिका फेटाळल्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने बैठक बोलाविली. मराठा आरक्षणाचा प्रश्न सत्ताधारी व विरोधकांनी एकत्र येऊन सोडवायला हवा. शिंदे-फडणवीस सरकार योग्य पद्धतीने काम करून मराठा समाजाला न्याय मिळवून देतील
- चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष, भाजपा.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.