BJP Sujay Vikhe : 'तिकडं सॉफ्टवेअर हँग झालं अन् लोकांनी मला इकडं हँग केलं'; मंत्री सावेंकडील दुग्ध खात्यावर विखेंनी फोडलं पराभवाचं खापर

BJP Leader Sujay Vikhe Comments Again on His Ahilyanagar Lok Sabha Election Defeat : भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांनी लोकसभातील पराभवावर पुन्हा मिश्किल भाष्य केलं आहे.
Sujay Vikhe 2
Sujay Vikhe 2Sarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar political news : भाजपचे अहिल्यानगरमधील माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी पराभवावर पुन्हा भाष्य केलं आहे. अतुल सावे यांच्याकडे असलेल्या दुग्ध विकास खात्याला यावेळी विखे पाटलांनी दोष दिला आहे.

विशेष म्हणजे, सुजय विखे पाटलांनी मंत्री सावे यांच्यासमोरच हा दोष दिला. यामुळे माजी खासदार विखे पाटलांचे विधान पुन्हा चर्चेत आलं आहे.

कोपरगावचे माजी आमदार नामदेवराव परजणे यांच्या 21व्या पुण्यस्मरणानिमित्त कार्यक्रम आयोजित केला होता. मंत्री अतुल सावे यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यात विखे पाटलांनी (Sujay Vikhe) लोकसभेतील पराभवाची सल बोलून दाखवली.

सुजय विखे पाटील म्हणाले, "दुग्ध विकास खाते खूप क्लिष्ट खाते आहे. मी या खात्यामुळेच माजी झालो. मागील अडीच वर्षे खाते माझ्या वडिलांकडे होते. दुधाचे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या (Farmer) खात्यात जमा होणार ही संकल्पना खूप चांगली होती. मात्र लोकसभा निवडणूक लागली अन् सॉफ्टवेअर हँग झाले. यानंतर लोकांनी मला हँग करून टाकले".

Sujay Vikhe 2
Thackeray Borther alliance confusion : ठाकरे बंधूंच्या युतीची शक्यता मावळली; उद्धव शिवसेनेची स्वबळाची तयारी, राज कोणता आदेश देणार?

"निवडणूक संपल्यावर शेतकऱ्यांच्या खात्यात दणादण पैसे यायला सुरुवात झाली. तोपर्यंत वेळ निघून गेली ती गेलीच. मला फार वाईट अनुभव आहे, अशी खंत भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांनी विद्यमान दुग्ध विकास मंत्री अतुल सावे यांच्यासमोर व्यक्त केली.

Sujay Vikhe 2
Pahalgam Attack : पहलगाम हल्ला नेमका कुणी केला? आतापर्यंतचा सर्वात मोठा ट्विस्ट, धक्कादायक माहिती समोर

दूध भेसळ रोखण्यासाठी कायदा

राज्यातील दुग्ध व्यवसायात भेसळीचे प्रमाण वाढत असल्याच्या तक्रारी येत आहेत. भेसळ रोखण्यासाठी लवकरच राज्यात नवा कायदा अस्तित्वात येईल. राज्यात दुधाला समान दर, एक राज्य- एक ब्रॅंड, एक जिल्हा -एक दूध संघ, एक गाव - एक दूध संस्था स्थापन करण्याबाबतची मागणी दूध उत्पादकांकडून होत आहे. त्यावर सरकारी पातळीवर अभ्यास समिती नियुक्त करून सर्वानुमते निर्णय घेण्यात येईल, असे राज्याचे दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com