Pahalgam Attack : पहलगाम हल्ला नेमका कुणी केला? आतापर्यंतचा सर्वात मोठा ट्विस्ट, धक्कादायक माहिती समोर

Initial Terrorist Sketches Released Post Pahalgam Attack : ‘एनआयए’ने आज जम्मू-काश्मीरमधील दोघांना अटक केली आहे. या दोघांनी तीन दहशतवाद्यांना राहण्यासाठी जागा, जेवण दिले होते.
Pahalgam Terror Attack, N
Pahalgam Terror Attack, NIA Sarkarnama
Published on
Updated on

NIA Investigation Reveals New Suspects : पहलगाम हल्ल्यानंतर दोन महिन्यांनी धक्कादायक माहिती समोर आली आहे. पहलगाममध्ये 22 एप्रिलला दहशतवाद्यांनी 26 पर्यटकांची गोळ्या झाडून हत्या केली होती. त्यानंतर तपास यंत्रणांनी संशयित दहशतवाद्यांची स्केच प्रसिध्द केली होती. पण आता दोन महिन्यांनी यामध्ये मोठा ट्विस्ट आला आहे. हल्ला करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली आहे.

‘एनआयए’ने आज जम्मू-काश्मीरमधील दोघांना अटक केली आहे. या दोघांनी तीन दहशतवाद्यांना राहण्यासाठी जागा, जेवण दिले होते. परवेज अहमद जोथर आणि बशीर अहमद जोधर अशी या दोघांची नावे आहेत. त्यांनीच दिलेल्या माहितीनुसार, तीन दहशतवादी हे लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित असून पहिल्यांताच त्यांची नावे समोर आली आहे.

आधीची स्केच चुकीची

हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीर पोलिसांनी तीन संशयित दहशतवाद्यांची स्केच जारी केली होती. त्यामध्ये एक स्थानिक दहशतवादी आदिल हुसैन टोकर आणि दोन पाकिस्तानी नागरिक हाशिम मूस आणि अली भाई यांचा समावेश होता. पण आता एनआयएच्या तपासामध्ये हल्ल्यात या तिघांचा समावेश नसल्याचे स्पष्ट झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Pahalgam Terror Attack, N
Pakistan Vs USA : ट्रम्प यांना पाकने दिला सर्वात मोठा धोका; शाही मेजवानीनंतरही थेट कट्टर शत्रूची साथ देत ठणकावले...

एनआयएच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपींचे जबाब आणि पुराव्यांच्या आधारे आता तीन नवी नावे समोर आली आहेत. हे तिघे लष्कर एक तोयबाचे दहशतवादी असून त्यांनी हल्ला केला होता. ज्यांचे स्केच प्रसिध्द करण्यात आले होते, ते हे तिघे नाहीत.

Pahalgam Terror Attack, N
PM Modi on US Attack : अमेरिकेने खळबळ उडवून देताच इराणची मोठी खेळी; 45 मिनिटांची चर्चा अन् ट्रम्प यांना झटका?

परवेज आणि बशीर यांनी जाणीवपूर्वक तीन दहशतवाद्यांना हल्ल्याआधी आश्रय, जेवण दिले. त्यांना मदत केली. त्यांनी एका झोपडीमध्ये दहशतवाद्यांना लपवले होते. तसेच हल्ल्यादिवशीही त्यांना मदत केली, असे एनआयएने म्हटले आहे. हल्ल्यानंतर तब्बल दोन महिन्यांनी दोघांना अटक करण्यात आली आहे. आता तीन पाकिस्तानी अतिरेकी कुठे लपले असावेत, याचा तपास सुरू करण्यात आला आहे.   

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com