Mahavikas Aghadi panel News : जिल्ह्यात सर्वाधिक रोमहर्षक ठरणाऱ्या धुळे तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकींतर्गत गुरुवारी माघारीच्या अंतिम दिवशी ४१ उमेदवार रिंगणात राहिले. त्यात व्यापारी व अडते मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार विजय चिंचोले आणि भाजप-भदाणे गटाच्या परिवर्तन पॅनलचे महादेव परदेशी बिनविरोध विजयी झाले. आता ३९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. (Mahavikas Aghadi panel will face strong opposition)
धुळे (Dhule) बाजार समितीवर काँग्रेसचे (Congress) एकहाती वर्चस्व राहिले आहे. यंदा काँग्रेससह महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) ताकदीने शह देण्यासाठी भाजप-(BJP) बाळासाहेब भदाणे गट रिंगणात उतरला आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.
बाजार समितीच्या १८ जागांसाठी प्रथम ३२० इच्छुकांनी अर्ज भरले. नंतर त्यात ४० अर्ज वैध ठरले. त्यामुळे उर्वरित २८० इच्छुकांपैकी आजअखेर २५२ जणांनी माघार घेतली. यात रिंगणात उरलेले २८ आणि अपील मंजूर झालेले १३, असे एकूण ४१ उमेदवार रिंगणात राहिले. पैकी श्री. चिंचोले आणि श्री. परदेशी यांची बिनविरोध निवड झाल्याने १६ जागांसाठी महाआघाडी व भाजप-भदाणे गटातील मिळून एकूण ३९ उमेदवारांमध्ये कांटे की लढत होईल.
आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेचा ठाकरे गट अर्थात महाविकास आघाडीचे शेतकरी विकास पॅनल विरुद्ध खासदार डॉ. सुभाष भामरे, बोरकुंडचे प्रथम लोकनियुक्त सरपंच बाळासाहेब भदाणे यांच्या नेतृत्वात परिवर्तन पॅनलमध्ये रोमहर्षक लढत होणार आहे. व्यापारी मतदारसंघातून महादेव परदेशी बिनविरोध निवडून आल्याने त्यांनी आमदार पाटील यांनी भेट घेत आभार व्यक्त केले, असे महाविकास आघाडीने सांगितले.
आमदार कुणाल पाटील यांनी बिनविरोध श्री. चिंचोले, श्री. परदेशी यांचा सत्कार केला. तसेच श्री. परदेशी, श्री. चिंचोले यांचा खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या हस्ते संपर्क कार्यालयात सत्कार झाला. व्यापाऱ्यांमध्ये संघर्ष नको, फूट पाडायची नाही म्हणून व्यापारी व अडते मतदारसंघासाठी व्यापाऱ्यांची संयुक्त बैठक झाली. त्यात दोन्ही पॅनलने प्रत्येकी एक उमेदवार देण्याचा निर्णय झाला. तो वरिष्ठांना मान्य झाल्याने परिवर्तन पॅनलमधून माझी बिनविरोध निवड झाली, असे श्री. परदेशी यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.