Amalner News: `त्या` आदेशाने ३८ माजी नगरसेवकांचे धाबे दणाणले!

Shoping Centre Encroachment Remove: अतिक्रमण ४५ दिवसांच्या आत काढण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
Collector Aman Mittal
Collector Aman MittalSarkarnama

Jalgaon Collector`s Order: अमळनेर शहरातील नगरपालिकेच्या लालबाग शॉपिंग सेंटरचे बेकायदेशीर अतिक्रमण ४५ दिवसांच्या आत निष्काषित करून त्याचा काढण्याचा संपूर्ण खर्च तत्कालीन नगराध्यक्ष पुष्पलता पाटील यांच्यासह ३८ नगरसेवकांकडून १८ टक्के व्याजासह वसूल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी दिले आहेत. (Collector`s order may politicaly problematic for 38 corporators)

अनंत निकम यांनी केलेल्या तक्रारींवर हा निकाल दिला आहे. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांकडे सुरू असलेल्या संपूर्ण प्रोसेडिंगला उच्च न्यायालयाने ४ फेब्रुवारी २०२२ ला अंतरिम स्थगिती दिली असल्याचा दावा माजी नगराध्यक्ष पुष्पलता पाटील यांनी केला आहे. त्यामुळे निकालाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

Collector Aman Mittal
Sinnar APMC election News : माणिकराव कोकाटे विरूद्ध राजाभाऊ वाजे लढत!

तत्कालीन लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांच्या कार्यकाळात ११ सप्टेंबर २०२० ला ठराव करून पालिकेच्या मालकीच्या लालबाग शॉपिंग सेंटरमधील व्यापाऱ्यांना आठ बाय बारा फूट बांधकाम करून अतिक्रमणास परवानगी दिली होती. यामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती आणि वाहनाच्या पार्किंगला जागा नव्हती. त्यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते अनंत निकम यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. (Latest Maharashtra News)

सुनावणी दरम्यान जिल्हाधिकारी मित्तल यांनी पुढीलप्रमाणे निष्कर्ष काढले आहेत. मुख्याधिकाऱ्यांच्या नगरपरिषद अधिनियम १९६५ चे कलम ९२ (३) प्रमाणे कोणती कारवाई केली, याबाबत कोणतेही दस्तऐवज नगरपरिषदेकडे उपलब्ध नाही, टीपी नंबर १२४ मधील गाळेधारकांनी आठ बाय बाराचे पक्के बांधकाम विनापरवानगीने केले आहे.

Collector Aman Mittal
Dhule APMC election news : आमदार जयकुमार रावल पॅनलचे दोघे बिनविरोध

जाहीर लिलाव पद्धतीचा अवलंब केलेला नाही, सहाय्यक संचालक नगररचना यांच्या शिफारशीला जावक क्रमांक नाही, तारीख नाही. अर्जदार निकम यांनी या गैरप्रकारास तत्कालीन नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, नगरसेवक नरेंद्र चौधरी, शीतल यादव, नूतन पाटील, संतोष पाटील, राधाबाई पवार, सुरेश पाटील, नरेंद्र संदानशिव, निशांतबानो कुरेशी, माया लोहरे, शेख सलीम शेख चिरागोद्दीन, सविता संदानशिव, मनोज पाटील यांचा समावेष आहे.

या आदेशात पुढील माजी नगरसेवकांचाही समावेष आहे, घनश्याम पाटील, ॲड. चेतना पाटील, विवेक पाटील, कल्पना चौधरी, निशांत अग्रवाल, संजय भिल, संगीता पाटील, आशा बागूल, संजय मराठे, ज्योती महाजन, प्रवीण पाठक, चंद्रकला साळुंखे, रामकृष्ण पाटील, राजेश पाटील, कमलबाई पाटील, प्रताप शिंपी, किरणबाई जाधव, रत्नमाला महाजन, देविदास महाजन, रत्ना महाजन, विनोद लांबोळे, महावीर पहाडे, सलीम शेख फत्तू, अभिषेक पाटील, फिरोजखान उस्मानखान पठाण यांना अपात्र ठरविण्यात यावे आणि तत्कालीन मुख्याधिकारी विद्या गायकवाड व जबाबदार अधिकारी यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली होती.

Collector Aman Mittal
Maratha Reservation: ''याला न्याय म्हणावा की निर्णय?''; मराठा आरक्षणाची याचिका फेटाळल्यावर या नेत्यानं ठेवलं मर्मावर बोट

मात्र नगराध्यक्षा व नगरसेवक यांची मुदत २०२१ मध्ये संपल्याने जिल्हाधिकारी मित्तल यांनी लालबाग शॉपिंग कॉम्पलेक्स टी. पी. नंबर १२४ मधील बेकायदेशीर वाढीव अतिक्रमण निष्काषित करून त्याचा काढण्याचा खर्च माजी नगराध्यक्षांसह ३८ नगरसेवकांकडून १८ टक्के व्याजासह ४५ दिवसांत वसूल करण्यात यावा, असे आदेश दिले आहेत व वसुलीची कार्यवाही न केल्यास संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध विभागीय चौकशी प्रस्तावित करावी, असेही आदेशात म्हटले आहे. (Latest Pune News)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com