Nitin Gadkari On Shirdi Road : नितीन गडकरींना अहिल्यानगरमध्ये यायला वाटते लाज! त्याला 'हा' रस्ता आहे, कारण...

Bjp Union Minister Nitin Gadkari Criticizes Delay on Ahilyanagar Shirdi Road Project Maharashtra News : अहिल्यानगर-शिर्डी रस्त्याच्या रखडलेल्या कामावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शिर्डीत नाराजी व्यक्त करताना, रस्ता पूर्ण करण्याची जबाबदारी स्वीकारली.
Nitin Gadkari On Shirdi Road
Nitin Gadkari On Shirdi RoadSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar Shirdi Road : अहिल्यानगर ते शिर्डी रस्त्याच्या कामासंदर्भात नाराजी व्यक्त करताना, हा रस्ता रखडल्यानं इथं यायला लाज वाटते, असे सांगताना या रस्त्याच्या कामासाठी आता आम्ही चौथी निविदा काढली आहे.

हा रस्ता सुरू होत नाही, तोपर्यंत काही खरं नाही. नाट लागल्यासारखं झालं आहे. या रस्त्याचं काम पूर्ण करण्याची जबाबदारी आपलीच आहे. पण आता हा रस्ता पूर्ण झाल्यावर, मला काही उद्घाटनाला बोलवून नका, असे केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी अहिल्यानगर ते शिर्डीपर्यंतचा रस्ता अडचणी ठरल्याचे सांगताना, यासाठी विखे पिता-पुत्रासह आताचे खासदार-आमदार देखील पाठपुरावा करत असल्याचे सांगितले. हा रस्ता चांगलाच अडचणीचा ठरला आहे. मलाही कळत नाही, आतापर्यंत तीन ठेकेदार आले. पण तिघांना निलंबित करावं लागलं. चौथी निविदा काढली आहे. नाईलाज आहे की, मी सगळी कामं ई-निविदा करून, पारदर्शकतेने करतो. या तिन्ही ठेकेदारांना ब्लॅक लिस्टेट करावं, त्यांची बँक गॅरंटी जप्त करावी, आणि ते पुन्हा कुठल्याही कामात येणार नाही, याची काळजी घ्यावी, अशा सूचना दिल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले.

Nitin Gadkari On Shirdi Road
Nitin Gadkari BJP : 'भारतमाला'मधील 42 हजार कोटींचा 'हा' प्रोजेक्ट पुन्हा सुरू होणार; कॅबिनेटची महिन्याभरत मंजुरीची शक्यता, नितीन गडकरींची घोषणा

अहिल्यानगर-शिर्डी (Shirdi) रस्त्यासाठी आता चौथी नवीन निविदा काढली आहे. निविदा कोणाला जाते हे आम्हाला माहिती नाही. निविदा कोण कसं भरतं, हे सांगता येणार नाही. पण हे काम आता चांगलं होईल, अशी अपेक्षा आहे. हे भिजतं घोंगडं, मार्गी लागेल. दरवेळी येताना, मला देखील वाईट वाटतं की, हे काम कसं रखडलं? पण आता ते काम देखील मार्गी लागेल, असा विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

Nitin Gadkari On Shirdi Road
Indian Weapons : भारतीय लष्कराचं ‘भीष्म’ बनलं ‘अभेद्य’! जाणून घ्या याच्या अफाट क्षमता

पण, अहिल्यानगर-शिर्डी रस्त्याचं काम झाल्यावर, त्याच्या भूमिपूजनाला येणार नाही, कारण याची मला लाज वाटते. कधीही असं काम होतं नाही. पण या तिन्ही ठेकेदारांची आता बँक गॅरंटी जप्त करून, त्यांच्यावर जेवढी कठोर कारवाई करता येईल, तेवढी करू. रस्ता सुरू होत नाही, तोपर्यंत काही खरं नाही. नाट लागल्यासारखं झालं आहे. पण याची सर्व जबाबदारी माझी आहे. या रस्त्याचे काम देखील उत्तम होईल, असा विश्वास देतो.

15 हजार कोटी रुपयांचे कामे मंजूर

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नांदूर शिंगोटे ते कोल्हार या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचं भूमिपूजन झालं. यावेळी नितीन गडकरी यांनी 2014 पूर्वी अहिल्यानगर जिल्ह्यात 202 किलोमीटर लांबीचे रस्ते होते. 2014 नंतर सुमारे 870 किलोमीटर रस्ते झाले. म्हणजेच आज 1071 किलोमीटरचे रस्ते झाले आहेत. या जिल्ह्यात 6802 कोटी रुपयांच्या रस्त्यांची कामं पूर्ण झाली आहेत. साडेतीन हजार कोटी रुपयांची कामे प्रस्तावित आहे. नवीन कामे 15 हजार कोटी रुपयांचे मंजूर आहेत. त्यात सुरत ते चेन्नई हा महत्त्वाचा कामं असल्याचे सांगितले. चार काम 1380 कोटी रुपयांची असून, त्याचा प्रारंभ झाला असल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले.

धुळे-अहिल्यानगर रस्ता सहा पदरी करणार

याशिवाय धुळे-अहिल्यानगर या रस्त्यावर मालेगाव-मनमाड-कोपरगावची लांबी 76 किलोमीटरची आहे. हा बीओटी प्रोजेक्ट होता. महाराष्ट्र सरकारने एनएच जाहीर न केल्याने आम्हाला काम करण्याची अडचण होती. पण त्याचा कालावधी संपला आहे. त्या रोडचा डिपीआर तयार करायला घेतला आहे. सध्या आम्ही चार पदरीचा विचार करत आहोत. पण जागा मिळाल्यास आम्ही हा रस्ता सहा पदरी करण्याचा विचार करत आहोत, याचेही काम सहा महिन्यात सुरू होईल. मनमाड ते धुळे हा रस्ता चौपदरीकरणाऐवजी सहा पदरी करण्याची सूचना देताना, पुढील 25 ते 50 वर्षे अडचण येणार नाही, असे नितीन गडकरी यांनी सांगितले.

नगर-सोलापूरचा रस्त्यासाठी 1100 कोटी

नगर-करमाळा-टेंभुर्णी-सोलापूर हा 80 किलोमीटर लांबीचं रस्ता चौपदरीकरण पूर्ण झालं आहे. करमाळा-टेंभुर्णी-सोलापूरच्या चौपदरीकरणासाठी 1100 कोटी रुपये मंजूर झाले आहे. याची निविदा मंजूर झाली आहे. नगर-सोलापूर हा रस्ता चौपदरीकरण होणार आहे. याशिवाय सीआरएफमध्ये 275 कोटी रुपयांची 31 कामे मंजूर केली असून, त्यातील 25 कोटींची तीन कामे सुरू होत आहे. निंबोडी-नारायणगाव-मांडवा, हिंगणी दुमला-धवलगाव-घारगाव-घोसे, चौंडी-गिरवाली-कडगाव-अरणगाव, अशी ही तीन कामं आहेत, असे नितीन गडकरी यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com