महापालिका निवडणुकीतही भाजप धरणार हिंदुत्वाची कास!

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या निवडणूक भाषणात हिंदुत्व, विकास अन्‌ शिवसेनेवरील टीकेला प्राधान्य.
Devendra Fadanvis
Devendra FadanvisSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : मागील पंचवार्षिक निवडणूक (NMC) ज्या दिवशी झाली. त्याच दिवसाचा पाच वर्षांनी मुहूर्त साधत भाजपने (BJP) महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकताना केंद्र सरकारच्या माध्यमातून साकारले जाणारे प्रकल्प, भगव्याचे रक्षक होण्याचे आवाहन करत हिंदुत्वाची दिलेली साद व शिवसेनेवरील (Shivsena) टीका, याच दिशेने निवडणुकीचा प्रचार राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Devendra Fadanvis
वल्गना अनेकांनी केल्या; आश्वासन मात्र शरद पवारांनी दिले

भाजप कार्यकर्ता मेळावा गोविंदनगर येथील मनोहर गार्डन येथे झाल. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार भाषण ठोकताना भाजप कार्यकर्त्यांमध्ये तरतरी आणताना निवडणुकीच्या प्रचाराची दिशा स्पष्ट केली. प्रथम जय भवानी, जय शिवाजी अशा घोषणा देत भगवा झेंड्याचे रक्षण करण्याची भाजपची जबाबदारी असल्याचे सांगितले. यावरून हिंदुत्वाच्या दिशेने निवडणूक नेण्याचे संकेत दिले. भाषणाच्या दुसऱ्या टप्प्यात केंद्र सरकारकडून महापालिकेसाठी दिलेले प्रकल्पांचे वाचन केले. मेट्रो निओचा उल्लेख करताना नाशिकसारख्या देशातील शहरांमध्ये नाशिक पॅटर्न म्हणून संकल्पना उदयाला येईल.

Devendra Fadanvis
भेदभाव सोपा, सर्वांना बरोबर घेण्याची क्षमता केवळ काँग्रेसकडे!

समृद्धी महामार्ग, सुरत- चेन्नई ग्रीन फिल्ड, डबलडेकर पूल, मुंबई महामार्गासाठी केंद्र सरकारकडून मिळणारे पाच हजार कोटी रुपये, नाशिक- पुणे सेमी हायस्पीड रेल्वे, नमामि गोदा प्रकल्प आदींचा उल्लेख करत विकासाचा मुद्दादेखील मतदारांसमोर मांडण्याची दिशा दिली. सर्वच प्रकल्प केंद्र सरकारने केले तर महापालिकेने काय केले या उपस्थित होणाऱ्या प्रश्‍नाला उत्तर म्हणून कोविड सेंटर, आयटी प्रकल्पांचा उल्लेख त्यांनी केला. मार्गदर्शनाच्या शेवटच्या टप्प्यात राज्य सरकार विरोधातील टीकेला धार चढविताना शिवसेनेला दलाल म्हणून संबोधल्याने प्रचार टोकाला नेण्याच्या अप्रत्यक्ष सूचनादेखील देताना प्रचाराची दिशा कार्यकर्त्यांना दिल्याचे मानले जात आहे.

रावलांची चुक, फडणवीसांची दुरुस्ती

मेट्रो निओ प्रकल्पाची घोषणा झाली असली तरी अद्यापही प्रकल्प सुरू न झाल्याची खंत नाशिककरांमध्ये आहे. भाजपचे प्रभारी आमदार जयकुमार रावल यांनी चार ते पाच वर्षात प्रकल्प होईल, असे भाषणात सांगितल्यानंतर ही बाब नाराजीला कारणीभूत ठरू शकते म्हणून फडणवीस यांनी तांत्रिक मुद्द्यांचे स्पष्टीकरण दिले. प्रकल्पाला विलंब झाल्यास राज्य सरकारवर जबाबदारी ढकलली तर रावल यांची चुक तत्काळ दुरुस्त केली.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com