वल्गना अनेकांनी केल्या; आश्वासन मात्र शरद पवारांनी दिले

ज्येष्ठ नेते शरद पवार वांजुळ पाणी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले.
Sharad Pawar with Girna delegation
Sharad Pawar with Girna delegationSarkarnama

मालेगाव : गिरणा खोऱ्यावरील अन्याय दूर करण्यासाठी कसमादे, नांदगाव यासह धुळे (Dhule) व जळगाव (Jalgaon) जिल्ह्याच्या हितासाठी वांजुळ पाणी प्रवाही वळण योजना मार्गी लावण्यासाठी आपण व्यक्तिशः लक्ष घालू. राज्य व केंद्र सरकारला सूचना करतानाच जलसंपदा विभागाचे मंत्री व समितीचे सदस्य यांची संयुक्त बैठक लवकरच घेऊन गिरणा खोऱ्याच्या त्रुटींच्या क्षेत्राला न्याय देऊ, असे आश्‍वासन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिले.

Sharad Pawar with Girna delegation
खडसेंची कोपरखळी; गुलाबराव पाटलांनी अभ्यास करून बोलावे!

येथील वांजुळ पाणी संघर्ष समितीचे सदस्य ॲड. शिशिर हिरे, प्रा. के. एन. आहिरे, निखिल पवार, कुंदन चव्हाण यांनी मुंबई येथे श्री. पवार यांची भेट घेऊन वांजुळपाणी प्रवाही वळण योजनेस मंजुरी देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारला सूचना करण्याबाबत साकडे घातले. त्यावेळी त्यांनी हे आश्‍वासन दिले.

Sharad Pawar with Girna delegation
उपनेते सुनील बागूल यांच्या स्वकीयांचा भगवा कोणता? शिवसेनेचा की भाजपचा?

नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात केमच्या डोंगरात पश्‍चिम वाहिनी नार, पार, अंबिका, औरंगा, ताण, माण या नद्या उगम पावतात. या नद्यांचे पाणी पूर्व भागातील तापी गिरणा खोऱ्यात वळवता येऊ शकेल. यातील बहुसंख्य नद्यांचे ५० टीएमसीहून अधिक पाणी गुजरातमार्गे समुद्रात जाते. गिरणा खोरे राज्यातील सर्वात तुटीचे खोरे आहे. या नद्यांचे पाणी प्रवाही वळण योजनेद्वारे तापी- गिरणा खोऱ्यात वळविणे आवश्यक आहे. या भागाच्या सिंचनात वाढ करण्यासाठी हा अंतिम व शाश्‍वत पर्याय आहे. याबाबत आपण स्वतः जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे यांच्या उपस्थितीत मालेगावच्या पाणी परिषदेत योजना मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्‍वासन दिले होते, याचीही आठवण करुन दिली.

गिरणा खोऱ्यासाठीच्या मांजरपाडा प्रकल्प गोदावरी खोऱ्यात वळविला. त्यावेळी जनक्षोभ उसळल्याने आंदोलनाची दखल घेत तत्कालीन जलसंपदा मंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठक घेत मांजरपाडा (देवसाने) प्रकल्प गोदावरी खोऱ्यात वळविण्याबरोबर गिरणा खोऱ्यासाठी मांजरपाडा- २ (वांजुळपाणी) प्रकल्प मंजूर करून तत्काळ प्रशासकीय मान्यता देत दोन्ही प्रकल्पांचे काम एकाचवेळी सुरू करण्याचे आश्‍वासन दिले होते.

सर्वपक्षियांकडून झाली होती वल्गना

मांजरपाडा- १ प्रकल्प पूर्ण होऊन पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्यात आले. मांजरपाडा- २ प्रकल्पास मंजुरीही नाही. जल आयोगाच्या शिफारशीनुसार महाराष्ट्र, गुजरात व केंद्र सरकार यांच्यात पाणी वाटप करार करून नार- पार गिरणा लिंक, पार तापी नर्मदा लिंक, पार गोदावरी लिंक करण्याचे नियोजित होते. त्यावेळी राज्याच्या हक्काचे पाणी गुजरातला जाऊ देणार नाही, अशी वल्गना राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी केली होती. युती सरकारने विधिमंडळात आश्‍वासन देत हक्काचे पाणी महाराष्ट्रातच वळविले जाईल, अशी ग्वाही दिली. केंद्रीय अर्थसंकल्प मांडताना केंद्रीय अर्थमंत्र्यांनी नार, पार, नर्मदा लिंक व दमणगंगा पिंजाळ लिंक करण्याचे सूतोवाच केले. त्यामुळे गिरणा खोऱ्याच्या हितास बाधा आली आहे.

स्थानिक आदिवासींचा पाठिंबा

वांजुळपाणी प्रवाही वळण योजनेस स्थानिक आदिवासींचा पाठिंबा आहे. योजनेत स्थानिकांना मोठा फायदा होईल. प्रवाही वळण योजनेमुळे लिफ्ट खर्चात बचत होणार आहे. माजी आमदार जे. पी. गावित व माजी खासदार हरीश्‍चंद्र चव्हाण यांनीही प्रकल्प मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

------

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com