हरिश्चंद्र चव्हाणांनी जेपी गावितांचा बालेकिल्ला एकहाती जिंकला

सुरगाणा नगरपंचायतीत भाजपने सर्वाधिक जागा मिळवल्या.
Harishchandra Chavan & J. P. Gavit
Harishchandra Chavan & J. P. GavitSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : अनेक वर्षे मार्क्सवादी कम्युनीस्ट पक्षाचा (CPM) बालेकिल्ला असलेल्या सुरगाणा नगरपंचायतीत भाजपचे (BJP) नेते, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सर्वाधिक ८ जागा जिंकल्या. येथे भाजपची सत्ता येणार आहे. माकपला हा मोठा राजकीय धक्का आहे.

Harishchandra Chavan & J. P. Gavit
निफाडला अनिल कदमच बॅास; राष्ट्रवादीच्या आमदार दिलीप बनकरांना धक्का

सुरगाणा नगरपंयाच निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी झाली. सकाळी अकराला सर्व निकाल घोषीत झाले. सतरा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेला ६, भाजपला ८, राष्ट्रवादी काँग्रेसला १ तर माकपला दोन जागा मिळाल्या.

Harishchandra Chavan & J. P. Gavit
नाशिक महापालिकेत भुजबळ, एकनाथ शिंदे यांच्या नावाने बदल्यांचे रॅकेट?

सुरगाणा हा प्रदिर्घ काळ मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाचा बालेकिल्ला राहिला आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा व ग्रामपंचायत अशा विविध सत्ता या पक्षाकडे राहिल्या आहे. जीव पांडू गावीत येथूल सलग पाच वेळा आमदार राहिले आहेत. मात्र भाजपने त्यांची नगरपंचायतची सत्ता काबीज केल्याने त्यांचा बालेकिल्ला ढासळला. माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सर्व जागांवर उमेदवार देण्यात आले होते. त्यात त्यांनी अतिशय परिश्रमपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस, माकप, शिवसेना आणि भाजप अशा चौरंगी लढतीत विजय खेचून आणला.

या निवडणुकीत भाजपाल ८, शिवसेनेला ६ तर माकपला अवघ्या दोन जागा मिळाल्या. या निवडणुकीचे प्रभागनिहाय निकाल असे, प्रभाग १ : भारत लक्ष्मण वाघमारे (शिवसेना, मते ९१), प्रभाग २ : सचिन रमेश आहेर (शिवसेना, मते ५६), प्रभाग ३ : पुष्पाबाई लक्ष्मण वाघमारे (शिवसेना, मते १०२), प्रभाग ४ : योगिता विजय पवार (माकप, मते ९०), प्रभाग ५ : माधवी राहुल थोरात (माकप, मते १३२), प्रभाग ६ : अरुणा भारत वाघमारे (शिवसेना, मते ११९), प्रभाग ७ : प्रमिला एकनाथ भोये(शिवसेना, मते १५८), प्रभाग ८ : सचिन रामदास महाले (भाजप, मते ८९), प्रभाग ९ : विजय धनराज कानडे(भाजप, मते ८६), प्रभाग १० : मालती खांडवी (भाजप, मते ७९), प्रभाग ११ : जानकी देशमुख (भाजप, मते ७७), प्रभाग १२ : भगवान आहेर (शिवसेना, मते १०१), प्रभाग १३ : अमृता पवार (भाजप, मते २०५), प्रभाग १४ : संजय पवार (भाजप, मते ४२), प्रभाग १५ : रंजना लहरे (भाजप, मते ३६), प्रभाग १६ : कासूबाई पवार (भाजप, मते १०१), प्रभाग १७ : जयश्री शेजोळ (राष्ट्रवादी काँग्रेस, मते ९६),

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com