Nayankuwar Rawal: भाजपनं धुळे जिल्ह्यात खात उघडलं! मंत्री रावल यांच्या मातोश्रींची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड

BJP Nayankuwar Rawal Elected Unopposed as Municipal President: रावल यांच्यासह भाजपचे आणखी सात नगरसेवकही बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे दोंडाईचा नगरपरिषद निवडणुकीत भाजपला वर्चस्व कायम ठेवण्यात यश आले आहे.
 Nayankuwar Rawal Elected Unopposed as Municipal President
Nayankuwar Rawal Elected Unopposed as Municipal PresidentSarkarnama
Published on
Updated on

स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या मतदानाआधीच भाजपनं गुलाल उधळला आहे. भाजपचा पहिला नगराध्यक्ष बिनविरोध निवडून आला आहे. खान्देशात भाजपाने विजयी सुरुवात केल्याने कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. नगरपालिका निवडणुकीत भाजपने धुळे जिल्ह्यामध्ये खात उघडलं आहे.

दोंडाईचा पालिकेत नगराध्यक्ष पदाचा पाहिला निकाल भाजपाच्या बाजूने लागला आहे. नगराध्यक्षपदी भाजपाच्या नयनकुवर रावल यांची बिनविरोध निवड झाली आहे.नयनकुवर रावल या राज्याचे मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री आहेत. त्या भाजपकडून नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार होत्या.

रावल यांच्यासह भाजपचे आणखी सात नगरसेवकही बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे दोंडाईचा नगरपरिषद निवडणुकीत भाजपला वर्चस्व कायम ठेवण्यात यश आले आहे. नयनकुवर रावल यांच्या विरोधातील उमेदवार शरयू भावसार यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याने रावल यांची बिनविरोध निवड झाली.

भावसार यांनी दोंडाईचा नगरपरिषदेचा मालमत्ता कर थकवल्याच्या मुद्द्यावरून भाजपाचे डॉ. रवींद्र देशमुख यांनी हरकत घेतली होती. त्यावर निवडणूक अधिकाऱ्यांकडे सुनावणी घेण्यात आली.

 Nayankuwar Rawal Elected Unopposed as Municipal President
Talegaon Nagarpalika election 2025: बंडखोरांनी महायुतीचा प्लॅन हाणून पाडला; भाजपमध्ये प्रवेश केलेल्यांच्या पदरी निराशा

निवडणूक अधिकाऱ्यांसमोर शरयू भावसार यांनी आपली बाजू मांडली, भावसार यांचा अर्ज बाद करण्यात आला. निकाल हा भाजपच्या बाजूने लागला. त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. छाननीत भावसार यांचा अर्ज बाद झाल्याने रावल यांची बिनविरोध निवड झाल्याची औपचारीकता फक्त बाकी राहिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com