Talegaon Nagarpalika election 2025: बंडखोरांनी महायुतीचा प्लॅन हाणून पाडला; भाजपमध्ये प्रवेश केलेल्यांच्या पदरी निराशा

Mahayuti Talegaon Nagarpalika election 2025: लोणावळा आणि वडगाव नगरपरिषदेत भाजप–राष्ट्रवादी एकमेकांसमोर उभे राहत असताना तळेगावात मात्र युती करण्यात आली. ही विसंगतीही स्थानिक राजकारणात चर्चेचा विषय ठरत आहे.
talegaon Dabhade Nagar Parishad
Talegaon Dabhade Nagar Parishad: Sarkarnama
Published on
Updated on

विजय सुराणा

तळेगाव दाभाडे : तळेगाव नगरपरिषदेची निवडणूक बिनविरोध नाही तर उलट अपक्षांच्या बंडामुळे ती अधिकच रंगतदार होणार आहे. भाजप–राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या युतीचा समीकरणं अचूक ठरली असली तरी तरी बिनविरोध निवडणूक घडवून आणण्याचा महायुतीचा प्लॅन मात्र अपक्षांच्या बंडखोरीमुळे हाणून पडला आहे.

अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी नगराध्यक्ष आणि सदस्य पदांसाठी मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाले. अनेक प्रभागांत अपक्ष उमेदवारांची संख्या लक्षणीय वाढल्याने युतीचा ‘फिट प्लॅन’ बिनविरोध निवडणुकीच्या स्वप्नावर पाणी फिरले.

स्थानिक पातळीवर निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलणे, आयात उमेदवारांना तिकीट देणे, नातेसंबंध जोपासण्यासाठी केलेले जागावाटप यामुळे दोन्ही पक्षांमध्ये असंतोष वाढला आहे. याचे प्रतिबिंब सोशल मीडियावर दिसत आले. त्याचा त्याचा थेट परिणाम अपक्ष बंडखोरांच्या वाढत्या संख्येत उमटला आहे.

लोणावळा आणि वडगाव नगरपरिषदेत भाजप–राष्ट्रवादी एकमेकांसमोर उभे राहत असताना तळेगावात मात्र युती करण्यात आली. ही विसंगतीही स्थानिक राजकारणात चर्चेचा विषय ठरत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समन्वयानंतर युती घडली असली, तरी नाराज कार्यकर्त्यांनामुळे महायुतीसमोर आव्हान उभे राहिले आहे.

तब्बल पाच उमेदवारांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केल्याने ही निवडणूक अधिकच चुरशीची बनली आहे. युतीकडून संतोष दाभाडे यांनी उमेदवारी अर्ज भरताच नाराज गटातील किशोर भेगडे यांनी स्वतंत्र उमेदवारी दाखल करत महायुतीला थेट आव्हान दिले. सदस्य पदांवरही अशीच परिस्थिती आहे. बहुतेक ठिकाणी अपक्षांची वाढलेली संख्या युतीसमोर कठीण समीकरणे उभी करत आहे.

talegaon Dabhade Nagar Parishad
ब्राह्मणांसाठी महाराष्ट्रात पहिलीच आर्थिक लाभाची योजना! किती जणांना लाभ मिळणार, वाचा

भाजपमध्ये नुकतेच प्रवेश केलेल्या गटातही प्रचंड नाराजी उफाळली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे किशोर भेगडे, बापूसाहेब भेगडे, तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि उद्योजक रामदास काकडे यांनी समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश करून तळेगाव नगरपरिषदेवर भाजपचा झेंडा फडकवण्याची रणनीती आखली होती. मात्र त्यांच्या विरोधाची दखल न घेता भाजपने राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करून फक्त ११ जागांवर समाधान मानले. यामुळे हा गट संतप्त झाला असून त्यांनी या निवडणुकीत अलिप्त राहण्याची घोषणा केली आहे.

याच नाराजीचा परिणाम म्हणून या गटाने नगराध्यक्ष पदासाठी किशोर भेगडे यांना रिंगणात उतरवण्याची मोर्चाबांधणी सुरू केली आहे. त्यामुळे युतीसमोर अनपेक्षित आव्हान निर्माण झाले असून निवडणुकीतील समीकरणे आणखी गुंतागुंतीची झाली आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com