Vivek Kolhe On Vikhe Patil: 'अडवणं अन् जिरवणं हाच विखे पॅटर्न, पण...'; विवेक कोल्हेंचा विखेंवर निशाणा

Ganesh Sugar Factory : गणेश सहकारी साखर कारखान्याची सर्वसाधारण सभा बाळासाहेब थोरात आणि विवेक कोल्हे यांच्या उपस्थितीत पार पडली.
Vivek Kolhe
Vivek Kolhe Sarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News: गणेश सहकारी साखर कारखान्याची सर्वसाधारण सभा जेष्ठ काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात आणि भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांच्या उपस्थितीत पार पडली. गणेश कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने सुरू झालेली विखे विरुद्ध थोरात-कोल्हे यांच्यातील खडाखडी पाहता अपेक्षे प्रमाणे थोरात आणि विवेक कोल्हेंनी विखेंवर थेट तोफ डागली.

यात विवेक कोल्हेंनी अडवणे आणि जिरवणे हाच विखे पॅटर्न असून मात्र, या जिरवाजीरवीत 'श्रीगणेश'ची जिरवू नका, कामगार, शेतकऱ्यांचे नुकसान करू नका, अडचणी आणू नका, असे सुनावत खोचक सल्ला दिला.

बाळासाहेब थोरात यांनीही विखेंच्या प्रवरा कारखान्याने जवळपास आठ वर्षे कारखाना कराराने ताब्यात होता. मात्र, या दरम्यान त्यांनी कारखाना नीट चालवला नाही. पूर्ण गाळप झाले नाही. यात कारखाना क्षेत्रातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी आमच्या ताब्यात कारखाना दिला आहे. आता ते प्रत्येक ठिकाणी अडचणी आणण्याचे काम करत असल्याचा आरोप थोरात यांनी केला.

Vivek Kolhe
NCP Mumbai President : मुंबईसाठी अजित पवार गटाने आखली रणनीती; समीर भुजबळांवर सोपवली मोठी जबाबदारी

कारखान्याचा जीएसटी भरायचा आहे, मशनरी मेंटेनन्स आहे, यासाठी कर्ज काढावे लागणे गरजेचे आहे. पण त्यात अडचणी आणल्या जात आहेत. आज सर्वसाधारण सभेत आम्ही काय बोलतोय म्हणून आमच्यावर कॅमेऱ्यातून लक्ष ठेवले जात आहे.

आमच्या सर्व गोष्टींवर त्यांचे लक्ष असते. मात्र, मी पण स्वातंत्र्य सैनिकाचा मुलगा आहे, कितीही दमबाजी केली तरी घाबरणारा नाही. तसेच सोबत विवेक कोल्हे आहेत. जेष्ठनेते शंकरराव कोल्हेंचे ते नातू आहेत. आम्ही शेतकऱ्यांच्या जीवनात फरक पडावा म्हणून एक समान वैचारिक भूमिकेतून एकत्र आलो आहोत, असे थोरात यांनी सांगत विखेंवर निशाणा साधला.

आम्हांला संगमनेरमध्ये धमक्या येतात. मी पण सत्तेत होतो. परस्थिती बदलत असते. सत्तेत असताना गर्व केला नाही पाहिजे. अनेक गोष्टींमध्ये आमच्याकडे (संगमनेर) लक्ष घातले जाते, असा आरोप थोरातांनी केला. सर्वसाधारण सभेस कारखान्याचे अध्यक्ष सुधीर लहारे, उपाध्यक्ष विजय दंडवते यांच्यासह एकनाथ गोंदकर, नारायण कार्ले, भगवान टिळेकर आदी संचालक, कारखान्याचे सभासद उपस्थित होते.

Edited By- Ganesh Thombare

Vivek Kolhe
NCP Mumbai President : मुंबईसाठी अजित पवार गटाने आखली रणनीती; समीर भुजबळांवर सोपवली मोठी जबाबदारी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com