NCP Mumbai President : मुंबईसाठी अजित पवार गटाने आखली रणनीती; समीर भुजबळांवर सोपवली मोठी जबाबदारी

Sameer Bhujbal NCP : राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदी समीर भुजबळ यांच्या नावाची घोषणा
Sameer Bhujbal
Sameer Bhujbal Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने मोठी रणनीती आखली असून, पक्ष संघटना वाढवण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. याच अनुषंगाने आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदी समीर भुजबळ यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत समीर भुजबळ यांना बुधवारी मुंबई अध्यक्षपदाचे नियुक्ती पत्र देण्यात आले आहे. त्यामुळे आता समीर भुजबळ मुंबईत सक्रिय होणार आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समीर भुजबळांची नियुक्ती ही महत्त्वाची मानली जात आहे.

Sameer Bhujbal
Kolhapur Politics: विकासाच्या मुद्द्यावर नव्या राजकीय समीकरणाची नांदी; कट्टर विरोधकांचे मनोमिलन ?

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करत अजित पवारांनी काही आमदारांसह सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राष्ट्रवादीच्या शरद पवार गट आणि अजित पवार गटात राजकीय संघर्ष सुरू झाला. यातच दोन्ही गटाने थेट मैदानात उतरत जाहीर सभा घेत पक्ष संघटना वाढण्यावर भर दिला आहे. आता राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने मुंबईची जबाबदारी समीर भुजबळांवर दिली आहे.

दरम्यान, नवाब मलिक हे राष्ट्रवादीचे मुंबईचे अध्यक्ष होते. मात्र, मनी लाँड्रिंग प्रकरणात ते तुरुंगात गेल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. त्यानंतर राष्ट्रवादीत फूट पडली. पक्षात पडलेल्या फुटीनंतर मलिक कोणत्या गटात जाणार, याबाबत अनेकांना उत्सुकता होती. पण मलिकांनी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता अजित पवार गटाने मुंबईच्या अध्यक्षपदाची जबाबदारी समीर भुजबळांवर सोपवली आहे.

Edited By- Ganesh Thombare

Sameer Bhujbal
Kolhapur Politics: मुश्रीफांकडे 'घाटगे' अस्त्र; घाटगेच ठरू शकतात घाटगेंच्या विजयी मार्गातील काटा ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com