BJP News; भाजपचे कार्यकर्ते भडकले, जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारले!

भाजप कार्यकर्ते म्हणतात, जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रपुरूषांचा अवमान केला.
BJP workers Agitation in Nashik
BJP workers Agitation in NashikSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) नेते माजी मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी राष्ट्रपुरूषांचा अवमान केला. ते सातत्याने आक्षेपार्ह विधाने करतात. त्यामुळे समाजात तेढ निर्माण होते, असा आरोप भारतीय जनता युवा (BJP) मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी केला. त्याविरोधात आज शहरात (Nashik) आव्हाड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून आंदोलन (Agitation) करण्यात आले. (BJP youth wing protest against NCP leader Jitendra Awhad)

BJP workers Agitation in Nashik
NCPNews; भाजपा व शिंदेंचे सरकार बागलाणला पाणी का देत नाही?

यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करीत त्यांच्या विरोधात घोषणा दिल्या. त्यानंतर प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी हा पुतळा ताब्यात घेतला. त्यावरून पोलिस व कार्यकर्त्यांत झटापट झाली.

BJP workers Agitation in Nashik
Satyajit Tambe News; सत्यजित तांबेंचा विजय, भाजपसाठी धडा!

पुणे येथे जाहिर कार्यक्रमात श्री. आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याचा दावा यावेळी करण्यात आला. त्याचा निषेध करीत भारतीय जनता युवा मोर्चाच्या नाशिक शहर शाखेच्यावतीने रविवार कारंजा येथे निषेध आंदोलन करण्यात आले.

भाजपचे सरकार अभ्यासक्रमातून मुघलांचा इतिहास काढून टाकणार आहे. त्यामुळे इतिहासातून मोगलांचा इतिहास काढून टाकणार याचा संदर्भ देत छत्रपती शिवाजी महाराजांनी लढाया केल्या आहेत. लढाया नाही केल्या तर ते काय गोटया खेळेले का? औरंगजेब आहे म्हणून शिवाजी महाराजांच्या नावाचा इतिहासात स्थान आहे ना? अफजलखान आहे म्हणून शिवाजी महाराज आहेत ना? शाहिस्तेखान आहे म्हणून शिवाजी महाराज आहेत ना? असे वादगस्त विधान आव्हाड यांनी केल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला.

कार्यकर्ते म्हणाले, यापुर्वी देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगकाठीवरून आव्हाड यांनी चुकीचे वक्तव्य केलेले आहे. ते वक्तव्य महाराष्ट्र अजून विसरलेला नाही. त्यानंतर देखील आव्हाड यांनी हे वक्तव्य करून भावना दुखावल्या आहेत. एकीकडे 19 फेब्रुवारी हि शिवरायांची जयंती सोहळा साजरा करण्याची महाराष्ट्रात जोरदार तयारी सुरु असतांना दुसरीकडे आव्हाडांनी हे वादग्रस्त विधान करून शिवप्रेमीना डिवचले आहे.

भाजपा युवा मोर्चा नाशिक महानगराचे अध्यक्ष अमित घुगे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात योगेश मैंद, भैरवी वाघ, अनिकेत पाटील, विजय बनछोडे, अंकित संचेती, सचिन तांबे, हर्षद जाधव, निखीलेश गांगुर्डे, प्रशांत वाघ, प्रविण भाटे, पवन उगले, प्रसाद धोपावकर, साक्षी दिंडोरकर, आदित्य केळकर, पवन गुरव आदी सहभागी झाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com