BJP Vs NCP : 'आता बस्स! पालख्या व्हायच्या नाहीत'; नगर विधानसभा भाजपच लढवणार, संग्राम जगतापांचे काय?

BJP On Ahmednagar Politics : लोकसभेच्या पराभवानंतर भाजप निष्ठावतांनी नगर शहर विधानसभा मतदारसंघावर दावा केला आहे. भाजपचे अभय आगरकर याबाबत आक्रमक झाले आहेत. भाजपच्या या आक्रमक भूमिकेमुळे महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
Abhay Agarkar, Sangram Jagtap
Abhay Agarkar, Sangram Jagtapsakarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिणेत भाजपला पलटी मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने बाजी मारली. हा निकाल भाजप निष्ठावतांना जिव्हारी लागला आहे. यातून धडा घेतलेल्या भाजप निष्ठावान विधानसभा निवडणुकी पूर्वीच आक्रमक झाली आहे. 'नगर शहर विधानसभा मतदारसंघात आता पालख्या व्हायच्या नाहीत. भाजपच ही जागा लढवणार', अशी आक्रमक भूमिका भाजपचे नगर शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांनी बोलवून दाखवली आहे.

लोकसभेनंतर आता विधानसभा निडवणुकीचे पडघम वाजू लागलेत. राज्यात महायुती की, महाविकास आघाडी राहील हे, पक्ष नेतृत्वांच्या चर्चेनंतर स्पष्ट होईल. मात्र पक्ष कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी आपपाल्या भूमिका मांडण्यास सुरवात केली आहे. नगर शहर विधानसभा मतदारसंघावर भाजपने (BJP) दावा करण्यास केला आहे. त्यामुळे महायुतीमध्ये अस्वस्थता पसरली आहे. ही जागा भाजप यंदा कोणत्याही परिस्थितीत लढणार असल्याचे दावा, अभय आगरकर यांनी व्यक्त केला आहे.

अभय आगरकर म्हणाले, "लोकसभा निवडणुकीत भाजपचे (BJP) उमेदवार सुजय विखे यांचे 2019 आणि 2024 ला भाजपकडून प्रामाणिकपणे काम झाले. 2019 मध्ये भाजपला नगर शहरातून 51 हजार तर, 2024 म्हणजेच यंदा 31 हजार मतांची आघाडी होती. शिवसेने (Shiv Sena) दिवंगत उपनेते अनिल राठोड यांनी नगर शहराचे 25 वर्षे प्रतिनिधीत्व केले. त्यावेळी देखील युती होती. तेव्हा देखील भाजपची भूमिका निर्णायकच होती".

पण आता बस्स झाले. प्रत्येकाला राजकीय अंकाक्षा असतात. महायुती असली तरी, आम्ही पक्षासाठी या जागेसाठी ठाम आहोत. पक्षाकडून ही जागा घेणारच आहोत. किती दिवस लोकांच्या पालख्या व्हायच्या, असे सांगून आगरकर यांनी आक्रमक भूमिका घेतली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Abhay Agarkar, Sangram Jagtap
Vivek Kolhe On MLA Kishore Darade : विवेक कोल्हेंचा आयुक्तालयात रुद्रावतार; दमदाटी करणाऱ्या आमदाराला पोलिसांसमोरच दरडावले...

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर राज्यातील सर्वच राजकीय गणित बदलली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट भाजप महायुतीबरोबर आहे. युतीत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा नगर शहर विधानसभा मतदारसंघात आमदार आहेत.

संग्राम जगताप येथून प्रतिनिधीत्व करत आहेत. गेल्या दोन टर्म ते आमदार आहेत. यात ते अजित पवार यांचे निकटवर्तीयांपैकी एक आमदार आहे. या मतदारसंघात संग्राम जगताप यांचा दांडगा जनसंपर्क आहे. आता या मतदारसंघावर महायुतीमधील भाजप निष्ठावानांकडून दावा केला जात आहे. त्यामुळे महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि संग्राम जगताप यांच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

Abhay Agarkar, Sangram Jagtap
Nilesh Lanke : खासदार लंकेंच्या पीएवर प्राणघातक हल्ला, विखे-लंकेंचे कार्यकर्ते भिडले

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com