Nilesh Lanke : खासदार लंकेंच्या पीएवर प्राणघातक हल्ला, विखे-लंकेंचे कार्यकर्ते भिडले

Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : पारनेरमध्ये खासदार नीलेश लंके आणि भाजपचे सुजय विखे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आज भरदुपारी राडा झाला. या धुमचक्रीमध्ये दोन्ही बाजूचे डझनभर कार्यकर्ते जखमी झाले आहेत. पारनेर पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली आहे.
nilesh lanke sujay vikhe 1
nilesh lanke sujay vikhe 1sarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : खासदार नीलेश लंके आणि सुजय विखे यांच्या समर्थकांमध्ये पारनेर बसस्थानकावर चांगलीच धुमचक्री झाली. यात लंके यांचे निष्ठावान कार्यकर्ते राहुल झावरे गंभीर जखमी झाले आहेत. याशिवाय या धुमचक्रीत लंके आणि विखे, असे दोन्ही गटातील डझनभर कार्यकर्ते जखमी झाले आहेत. पारनेर बसस्थानकावर भर दुपारी ही धुमचक्री झाल्याने पळापळ झाली. पोलिसांनी बंदोबस्त वाढवला असून, दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांची धरपकड करण्यास सुरूवात केली आहे.

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नीलेश लंके आणि भाजपचे (BJP) सुजय विखे यांच्यात अटीतटीची लढाई झाली. यात नीलेश लंके खासदार झाले. लोकसभेसाठी विखे यांनी लंके यांच्या होमग्राऊंडवर बरीच फोडाफोडी केली. लंकेंच्या जवळचे कार्यकर्ते फोडून विखेंनी बरोबर घेतले. माजी नगराध्यक्ष विजय औटी यांनी यात विखेंची साथ केली. विजय औटी यांच्याबरोबर असलेले त्यांचे कार्यकर्ते लंके यांच्या विजयानंतर काहीसे तणावातच आहे. मात्र लंके यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. यातूनच ही पारनेरमधील बसस्थानकावर विखे आणि लंके यांच्या कार्यकर्त्यांमध्ये धमुचक्री झाली.

राहुल झावरे आणि विजय औटी हे आपआपल्या कार्यकर्त्यांबरोबर समोरसमोर येऊन ही धुमचक्री झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. यात गाड्यांचे फोडाफोडी झाली. दोन्ही गट भिडल्याने कोण, कोणाला मारत होत हेच कळत नव्हते. यात नीलेश लंके यांचा पीए राहुल झावरे गंभीर जखमी झाले. हा राडा एवढा वाढला की, बसस्थानकावर पळापळी झाली. त्यामुळे काही क्षणात बसस्थानक परिसरातील व्यवसायिकांनी दुकाने बंद करून घेतली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

nilesh lanke sujay vikhe 1
Nilesh Lanke : नीलेश लंकेंच्या घातपाताचा होता डाव, मातुश्री शकुंतलांनी दिली 'ही' माहिती

राहुल झावरे गंभीर जखमी झाल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याशिवाय डझनभर कार्यकर्ते या धुमचक्रीत जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. पारनेर पोलिसांना या धुमचक्रीची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पारनेर बसस्थानकासह काही संवेदनशील भागात पारनेर पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. तसेच पारनेर पोलिसांनी या धुमचक्रीत सहभागी असलेल्याची नावे काढली असून, त्यानुसार धरपकड सुरू केली आहे. या धुमचक्रीवरून पारनेरमध्ये विखे आणि लंके यांच्यातील राजकीय संघर्ष वाढणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

nilesh lanke sujay vikhe 1
Balasaheb Thorat On Radhakrishna Vikhe : विखेंसोबत छत्तीसचा आकडा; बाळासाहेबांनी सेलिब्रेशनात जिलेबी वाटली

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com