भाजपची पश्चातबुद्धी; म्हणतात तुकाराम मुंडेनी लादलेली करवाढ मागे घेणार!

सत्ता असताना आयुक्त तुकाराम मुंडेंच्या करवाढीवर भाजपने बाळगले होते मौन.
Mayor Satish Kulkarni
Mayor Satish KulkarniSarkarnama

नाशिक : महापालिकेत (NMC) भाजपची सत्ता असताना तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंडे (Tukaram Munde) यांनी नाशिककरांवर लादलेली मालमत्ता करातील वाढ रद्द करण्याची उपरती शेवटच्या महासभेत भाजपला (BJP) सुचली. निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजपने करवाढ मागे घेण्याची केलेली मुत्सदेगिरी विरोधकांना टीकेची संधी देणारी ठरणार आहे.

Mayor Satish Kulkarni
महापौर सतीश कुलकर्णी रणांगणात उतरणार नाही!

महासभेने करवाढ रद्द करण्याचा ठराव संमत केला तरी एकदा केलेली वाढ रद्द करता येत नाही व तसे करायचे झाल्यास राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडे प्रस्ताव सादर करावा लागतो. त्यामुळे करवाढ रद्दचे मृगजळ ठरणार आहे.

Mayor Satish Kulkarni
नाशिकमध्ये `आप`चा जल्लोष, पंजाबच्या विजयाने नवीन राजकीय पर्याय!

महापौर सतीश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली सहाव्या पंचवार्षिकमधील शेवटच्या महासभेत माजी स्थायी समिती सभापती हिमगौरी आहेर- आडके यांनी करवाढ मागे घेण्याचे प्रस्ताव सादर केला. पत्राचे वाचन केल्यानंतर महापौर कुलकर्णी यांनी सविस्तर विवेचन केले. महापालिका हद्दीत औद्योगिक वसाहत असल्याने कारखाने कायम राहावे म्हणून पूर्वी कमी दर ठेवले होते, परंतु मुंडे यांनी मूल्यांकन दरात वाढ केल्याने थकबाकीचे प्रमाण वाढले. महापालिकेने विकसित व अविकसित भागाचे सर्वेक्षण करून मूल्यांकन दर निश्‍चित करावे व १ एप्रिल २०१८ पासून लागू करण्यात आलेली दरवाढ योग्य विचार करून रद्द करावी, असा प्रस्ताव संमत केला.

मुख्यालयात छत्रपतींचा पुतळा

पुणे महापालिकेच्या धर्तीवर नाशिक महापालिका मुख्यालयाच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराज यांचा ब्रांझ धातूचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचे पत्र नगरसेवक जगदीश पाटील यांनी दिले. त्याला महासभेने मंजुरी दिली. त्याशिवाय सहा विभागात प्रत्येकी एक तक्रार निवारण केंद्र, सिडको विभागात नवीन अग्निशमन केंद्र, तसेच भारतनगर झोपडपट्टीवासीयांना घरकुलांचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला.

शेवटच्या महासभेतही नाराजी

ऑफलाइन महासभेला प्रशासनाने परवानगी नाकारल्यानंतर नाइलाजाने ऑनलाइन महासभा घेण्यात आली. प्रारंभी प्रशासनाकडून कोणीच उपस्थित नसल्याने महापौरांनी नाराजी व्यक्त केली. प्रशासन प्रमुख येत नाही, तोपर्यंत महासभा सुरू न करण्याचा निर्णय घेतला. नगरसचिव राजू कुटे यांनी ऑनलाइन अधिकारी हजर असल्याचे सांगितले. परंतु, प्रत्यक्ष सभेला हजर राहण्याचा आग्रह महापौर कुलकर्णी यांनी धरला. अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे हजर झाल्यानंतर महासभा नियमित सुरू झाली.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com