Pune Bypoll Election : कसब्यात दुहेरी, तर चिंचवडला तिंरगी लढत ; मतदानास सुरवात

Assembly bypolls in Kasba and Chinchwad latest News : पैसे वाटल्याचा आरोप
Assembly bypolls in Kasba and Chinchwad latest News
Assembly bypolls in Kasba and Chinchwad latest News Sarkarnama
Published on
Updated on

Assembly bypolls in Kasba and Chinchwad latest News : कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी मतदानास सुरवात झाली आहे.

कसब्यात भाजपचे हेमंत रासने विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर अशी दुहेरी लढत आहे. तर चिंचवड मतदारसंघाचा आघाडीचे नाना काटे, भाजपच्या अश्विनी जगताप, अपक्ष उमेदवार राहुल कलाटे अशी तिरंगी लढत होत आहे.

Assembly bypolls in Kasba and Chinchwad latest News
Assembly bypolls in Kasba and Chinchwad latest NewsSarkarnama

गेल्या दोन आठवड्यापासून सुरू असलेल्या प्रचाराची शुक्रवारी सायंकाळी सांगता झाली. आज मतदान होत आहे. पोटनिवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दोन्ही मतदार संघात पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आला आहे.

कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.या चुरशीच्या निवडणुकीत भाजपकडून मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांसह जवळपास डझनभर मंत्री,नेते प्रचारात उतरवले होते. तर काँग्रेस व राष्ट्रवादीकडून देखील माजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह राज्यातील कार्यकर्ते, नेत्यांची फौज उभी केली होती.

Assembly bypolls in Kasba and Chinchwad latest News
Maharashtra Cabinet Expansion : शिंदे-फडणवीसांनी दिलेले संकेत धूसर..; मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त...

काँग्रेस कसब्यात पराभव दिसू लागल्याने भाजप नेते सत्तेचा गैरवापर करत आहेत. पोलिसांच्या मदतीने मतदारांना पैसे वाटले जात आहेत. काही सोसायट्यांत गुंडगिरीही केली जात आहे, असा आरोप करत धंगेकर यांनी शनिवारी उपोषण केले. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन पोलिस अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले.

विधानसभा पोटनिवडणुकीत चिंचवडमध्ये भाजपच्या तीन कार्यकर्त्यांना असे पैसे वाटतानाच पकडण्यात आले. त्यामुळे मोठी खळबळ उडाली असून याबाबत पोलिसांनी गुन्हा (एनसी) नोंदवला आहे.

या त्रिकूटाकडून एक लाख ७० हजार रुपयांची रोकड,भाजप उमेदवाराचे नाव व पक्षाचे चिन्ह कमळ चिन्हाच्या स्लिपा आणि मतदारांच्या नावाची यादी हस्तगत करण्यात आली आहे. माधव मल्लिकार्जून मनोरे (वय ५,रा.रहाटणी),स्वप्नील सुरेश फुगे (वय ३५)आणि कृष्णा बालाजी माने (वय २४,दोघेही रा. फुगेवाडी) अशी आरोपींची नावे आहेत. मनोरे हा भाजपच्या प्रभाग ३३ चा अध्यक्ष असल्याचे सांगण्यात आले आहे.

कसबा मतदारसंघासाठी २७० केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडणार असून याठिकाणी दोन लाख 75 हजार 428 मतदार आहेत. तर, चिंचवडमध्ये मतदार संघासाठी ५१० केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार असून येथऊन एकूण 5 लाख 68 हजार 954 मतदार आहे. दरम्यान, आज पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला असून सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com