

Education Scam News: 160 कोटींच्या शालार्थ आयडी घोटाळ्याचे प्रकरण राज्यभर चर्चेत आहे. यामध्ये शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेला घोटाळा व त्यातील धक्कादायक प्रकाराने राज्य शासन हादरले आहे. याप्रकरणी विधिमंडळातही चर्चा झाली. शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी याचा तिसऱ्यांदा जामीन फेटाळला आहे. नासिक रोडच्या जिल्हा सत्र न्यायालयात काल झालेल्या सुनावणीत उपासने याला तिसऱ्यांदा जामीन नाकारण्यात आला. त्यामुळे हे प्रकरण गंभीरवळणावर पोहोचले आहे.
विभागातील तीन जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांसह 14 अधिकारी यापूर्वीच पोलिसांच्या कोठडीत आहेत. त्यांना देखील जामीन नाकारण्यात आला आहे. या 14 अधिकाऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात जा मिळण्यासाठी अर्ज केला आहे. त्यावर आज सुनावणी होणार आहे. विविध बनावट शिक्षण संस्था स्थापन करून शासनाचा निधी हडप करण्याचे धक्कादायक प्रकरण बोगस शालार्थ आयडी या माध्यमातून घडले.
त्यात थेट शिक्षण उपसंचालक आणि जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी पैसे घेऊन बोगस प्रकरणे मंजूर केले. यामध्ये 861 बनावट शिक्षकांना वेतन व अनुदान मंजूर करीत 160 कोटींचा अपहार झाल्याचे उघड झाले आहे. या संदर्भात नाशिकचे पोलीस उपायुक्त व 14 कर्मचाऱ्यांचे विशेष पोलीस तपास पथक तयार करण्यात आले आहे. या पथकाने सत्ताधारी भाजप नेत्यासह राजकीय लागेबांधे असलेल्या शिक्षण संस्था चालकांनाही ताब्यात घेतले आहे. भाजपचा नेता आणि कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांचा निकटवर्तीय या प्रकरणात अटकेत आहे.
तीन जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांचं अन्य 11 अधिकाऱ्यांच्या जामिनावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने यातील अन्य आरोपींचे जामीन यापूर्वीच फेटाळले आहेत. त्यामुळे शिक्षण विभागातील 160 कोटींच्या धक्कादायक गैरव्यवहार प्रकरणात आरोपींचा मुक्काम कारागृहात की जामीनावर सुटका याचा फैसला आज होणार आहे.
शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी गेले नऊ महिने पोलीस कोठडीत आहे. त्याच्या विरोधात भक्कम पुरावे सादर करण्यात आले आहेत. शिक्षण विभागातील या धक्कादायक भ्रष्टाचाराने शासकीय यंत्रणा हादरून गेली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.