Chhagan Bhujbal Corona Positive: Breaking! छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण

Chhagan Bhujbal Health Update : गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढू लागला आहे.
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Nashik News : गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा कोरोना डोकं वर काढू लागला आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना पाहायला मिळत आहे. याचदरम्यान, आणखी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री छगन भुजबळ यांना देखील कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे.

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ हे येवला दौऱ्यावर आले होते. तेथील नियोजित कार्यक्रम आटोपून ते नाशिकला परतत असतानाच त्यांना थंडी, ताप आला होता. यामुळे त्यांना तातडीनं अपोलो रग्णालयात देखील उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर डॉक्टरांनी वैद्यकीय तपासणी केल्या होत्या. मात्र, तपासणी करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता.

Chhagan Bhujbal
Sharad Pawar On Savarkar Dispute: राहुल गांधी यापुढे सावरकरांवर बोलणार नाहीत; पवारांच्या मध्यस्थीनंतर काँग्रेसची भूमिका!

विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशननंतर छगन भुजबळ(Chhagan Bhujbal) हे आजारी पडले होते.त्यांना सोमवारी ताप आल्यानंतर त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. यात भुजबळ यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालं आहे.

देशात XBB.1.16 व्हेरियंटचे रुग्ण अधिक

देशात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. सध्या देशात XBB.1.16 व्हेरियंटचे रुग्ण अधिक आढळत असल्याने वाढत्या कोरोना रुग्ण संख्येचं कारण हा व्हेरियंटच असल्याचं मानलं जात आहे. देशात कोरोनाच्या XBB.1.16 व्हेरियंटचे आतापर्यंत 610 रुग्ण आढळले आहेत. या व्हेरियंटचा 11 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात शिरकाव झाला आहे.

Chhagan Bhujbal
Devendra Fadnavis Threat: देवेंद्र फडणवीसांच्या घरासमोर बॉम्ब ठेवल्याची धमकी...

सक्रिय रुग्णांचा आकडा 10 हजारांवर

देशातील रुग्णसंख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत भारतात कोरोनाचे 1805 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर कोरोनाच्या सक्रिय रुग्णांचा आकडा 10 हजारांच्या पुढे पोहोचला आहे. सध्या देशात 10 हजार 300 कोरोना रुग्ण उपचाराधीन आहेत.

कोविड वॉर्ड पुन्हा सुरू...

महाराष्ट्रात कोविडचा प्रादुर्भाव झपाट्यानं वाढत आहे. ऑक्‍टोबरनंतर प्रथमच सक्रिय प्रकरणांचा आकडा २ हजारच्या वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासात 123 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. ही चिंताजनक बाब आहे. मुंबईतील रुग्णालयांमध्ये 43 कोरोना रुग्ण दाखल आहेत. यापैकी 21 जणांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. मुंबईत कोविडच्या सक्रिय रुग्णांची संख्या 500 च्या पुढे गेली आहे. अशा परिस्थितीत पुन्हा कोविड वॉर्ड सुरू करण्यात येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com