Sharad Pawar On Savarkar Dispute: राहुल गांधी यापुढे सावरकरांवर बोलणार नाहीत; पवारांच्या मध्यस्थीनंतर काँग्रेसची भूमिका!

Sharad Pawar News : भाजपचा सामना करायचा असेल तर, आपसात मतभेद असून चालणार नाही,
Sharad Pawar : Rahul Gandhi
Sharad Pawar : Rahul GandhiSarkarnama
Published on: 
Updated on: 

दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) आता यापुढे सावरकरांवर टीका करणार नाहीत, अशी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बातमी समोर येत आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मध्यस्थी केल्याचे समोर येत आहे. काल संध्याकाळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी विरोधी नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत राहुल गांधी आणि् शरद पवार दोन्ही नेते उपस्थित होते.

Sharad Pawar : Rahul Gandhi
Nagpur After Civil20 India: सी-२० नंतर कोमजली हिरवळ; दिव्यांची आरास काढली, पण खिळे कायम?

सावरकरांना माफिवीर म्हणणे योग्य नाही. सावरकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यामध्ये काही संबंध नाही, अशी भूमिका पवारांनी बैठकीत मांडली आणि यावर खरगे यांनी सहमती दर्शवली, असे बोलले जात आहे. राहुल गांधींनी सुद्धा आपण पवारांच्या मताचा आदर करतो, असं म्हंटलंय, अशी माहिती मिळत आहे. आपल्याला भाजपचा सामना करायचा असेल तर, आपसात मतभेद असून चालणार नाही, असेही राहुल गांधी म्हंटल्याचे बोलले जात आहे.

Sharad Pawar : Rahul Gandhi
Devendra Fadnavis Threat: देवेंद्र फडणवीसांच्या घरासमोर बॉम्ब ठेवल्याची धमकी...

यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचीही प्रतक्रिया आली आहे. राऊत म्हणाले, ठकाल बैठकीमध्ये शरद पवार यांनी वीर सावरकर काय होते, त्यांची भूमिका काय होती, यावर परखड भाष्य करून, काँग्रेसच्या नेत्यांना सांगितले. हा विषय आघाडीतला अडथळा ठरू नये, अशी मध्यस्थी केली. आणि पवारांनी मांडलेल्या या मुद्द्याला विरोधी पक्षांनी समर्थन दिले.काँग्रेसच्या नेत्यांनी याबाबत माझ्याशीही चर्चा केली आहे. याबाबत चर्चेतूनच मार्ग काढला जाईल."

दरम्यान, राहुल गांधी यांनी नुकतेच सावरकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. माफी मागायला मी सावरकर आहे का? मी गांधी आहे. आणि गांधी कधी माफी मागत नाहीत, अशा आशयाचं विधान राहुल गांधी यांनी केले होते. यानंतर मालेगावच्या सभेतून उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधींना इशारा दिला होता.


सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.