Ajit Pawar Vs Nilesh Lanke : अजितदादा अन् खासदार लंकेंमध्ये 'टशन' रंगणार, राणी लंकेंना कोण रोखणार?

Parner Assembly Constituency : नीलेश लंके खासदार झाल्यानंतर पारनेर विधानसभा मतदारसंघातून त्यांच्या पत्नी राणी लंके यांचे आमदारकीसाठी नाव चर्चेत आहे. या मतदारसंघावर अजित पवार गटाचा भक्कम दावा असल्याने विधानसभेच्या निवडणुकीनिमित्ताने येथे 'टशन' पाहायला मिळेल.
Ajit Pawar | Rani Lanke | Nilesh Lanke
Ajit Pawar | Rani Lanke | Nilesh LankeSarkarnama

Ajit Pawar Vs Nilesh Lanke News : विधानसभा निवडणुकीच्या मैदानात लढत रंगेल ती, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात! ही दोन्ही गट राज्यात अनेक ठिकाणी आमने-सामने येणार आहे.

यातच सर्वाधिक चर्चेत असलेल्या विधानसभा मतदारसंघापैकी पारनेर असेल. या मतदारसंघात अजित पवार आणि खासदार नीलेश लंके यांच्यात 'टशन' रंगण्याची शक्यता आहे.

पारनेर विधानसभा मतदारसंघातून आमदारकीचा राजीनामा देत नीलेश लंके खासदार झाले. यासाठी नीलेश लंके (Nilesh Lanke) यांनी शरद पवार यांची 'तुतारी' हाती घेतली. आता पारनेर मतदारसंघात आमदारकीसाठी कोण याची चर्चा सुरू आहे. नीलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांचे नाव पुढे आले आहे. राणी लंके या जिल्हा परिषदेच्या सदस्य राहिल्या आहेत.

याशिवाय नीलेश लंके यांच्याबरोबर खासदारकीच्या निवडणुकीत राणी लंके सावलीसारख्या उभ्या होत्या. पारनेर विधानसभा मतदारसंघ नीलेश लंके यांच्या खासदारकीसाठी राणी लंके यांनी पायदळी तुडवला. त्यामुळे राणी लंके यांचे नाव आमदारकीसाठी चर्चेत आहे.

राष्ट्रवादी (NCP) एकसंघ असताना नीलेश लंके पारनेरमधून निवडून आले होते. अजित पवारांनी त्यांना हेरले होते. राष्ट्रवादी फुटीनंतर नीलेश लंके यांनी अजितदादांना साथ दिली. पण, खासदारकीसाठी शरद पवारांकडे आले. अजित पवार महायुतीत आहेत.

त्यामुळे पारनेर विधानसभा मतदारसंघात ते महायुतीतून दावा करू शकतात. खासदार नीलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके निवडणुकीच्या मैदानात आल्यास त्यांना प्रतिस्पर्धी उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचाच असेल, तशी शक्यताच जास्त आहे. अजितदादांनी या मतदारसंघात उमेदवाराची चाचपणी सुरू केली आहे. यामुळे पारनेरमध्ये अजित पवार आणि खासदार नीलेश लंके यांच्यात टशन रंगू शकते.

Ajit Pawar | Rani Lanke | Nilesh Lanke
Nilesh Lanke Meet Gaja Marne Video : नीलेश लंके वादाच्या भोवऱ्यात, खासदार होताच गुंड गजा मारणेच्या दारी!

अजित पवार यांनी पारनेरमध्ये उमेदवाराची चाचपणी सुरू केली असल्यास त्यांना महायुतीतून भाजप आणि शिवसेनेची साथ मिळले का, हे देखील अजितदादांकडून तपासले जात आहे. नीलेश लंके यांचा रथ रोखण्यासाठी महायुती पारनेरमध्ये एकत्र येण्याची शक्यताच जास्त आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजप मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या बाजूने पारनेरमधील माजी आमदार विजय औटी, माजी सभापती काशीनाथ दाते, सुजित झावरे, विश्वनाथ कोरडे, जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड, भाजपचे तालुकाध्यक्ष राहुल शिंदे, शिवसेना शिंदे गटाचे तालुकाप्रमुख विकास रोहोकले असे मातब्बर नेते होते.

पारनेरमध्ये नीलेश लंके यांची यंत्रणेने या मातब्बर नेत्यांवर मात केली. मतदान घडवून आणत मताधिक्य मिळवले. सहाजिक महाविकास आघाडीचे देखील नीलेश लंके यांना स्थानिक पातळीवर बळ मिळाले.

Ajit Pawar | Rani Lanke | Nilesh Lanke
Video Nilesh Lanke News : 'गज्या मारणे की, गरम चाय की प्याली'; नीलेश लंकेंना भोवली !

राणी लंके यांची तयारी सुरू असली तरी, महाविकास आघाडीतील काही इच्छुकांनी चाचपणी सुरू केली आहे. यामुळे नीलेश लंके यांची देखील तिथे डोकेदुखी वाढणार आहे. या डोकेदुखीला अजितदादांकडून हवा मिळण्याची शक्यता अधिक आहे. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख डॉ. श्रीकांत पठारे, डॉ. भास्कर शिरोळे, माजी सभापती संदेश कार्ले यांची नावे चर्चेत आहे.

या सर्वांच्या मातोश्रीवर फेऱ्या वाढल्या आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत पेच निर्माण होऊ शकतो. भाजपने देखील विधानसभेसाठी चाचपणी सुरू केली आहे. भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे यांच्यावर पारनेर विधानसभेची जबाबदारी दिली आहे.

भाजपचे (BJP) मंत्री राधाकृष्ण विखे यांचे पारनेर तालुक्यात संघटन चांगले आहे. त्यामुळे भाजप देखील मतदारसंघावर दावा सांगू शकते. त्यामुळे अजित पवारांच्या या मतदारसंघावरील दाव्याबाबत अडचणी वाढू शकतात.

( Edited By : Akshay Sabale )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com