TET Exam Scam : शिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक आणि दोन शिक्षकांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा

Another crime to cover up TET fraud : शिक्षक पात्रता परीक्षेच्या TET प्रमाणपत्रातील बनवेगिरी उघड झाली असून ती झाकण्यासाठी पुन्हा दुसरा गुन्हा केल्याचा प्रकार अहमदनगरमध्ये उघडकीस आला आहे. प्रभारी शिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक आणि दोन शिक्षकांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
TET Exam Scam
TET Exam ScamSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : शिक्षक पात्रता परीक्षेतील (TET Exam Scam) गैरव्यवहार चांगलाच गाजला. या गैव्यवहाराची व्याप्ती राज्यपातळीवर असल्याचे आरोप झाले. ही परीक्षा उत्तीर्ण करून देण्यासाठी 7 हजार 880 उमेदवारांकडून प्रत्येकी दोन ते तीन लाख रुपये घेण्यात आल्याची शक्यता वर्तवली गेली. पुणे सायबर पोलिसांनी 2019 च्या परीक्षेत राज्यातील 7 हजार 800 उमेदवार बोगस पद्धतीने उत्तीर्ण झाल्याचे तपासात उघड झाले.

आता अहमदनगर जिल्ह्यात शिक्षक पात्रता परीक्षेच्या TET प्रमाणपत्रातील बनवेगिरी उघड झाली असून ती झाकण्यासाठी पुन्हा दुसरा गुन्हा केला आहे. याप्रकरणी प्रभारी शिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक आणि दोन शिक्षकांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

प्राथमिक शिक्षण विभागाचे तत्कालीन प्रभारी शिक्षणाधिकारी गुलाब सय्यद, कनिष्ठ सहायक सी. एस. धनवळे, एटीयू जदीद उर्दू प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नासीर ख्वाजालाल खान, शिक्षक शेख दानिस जब्बार आणि खान इम्रान आयुब अशा पाच जणांविरुद्ध फसवणुकीचा (Fraud) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपशिक्षणाधिकारी राजश्री घोडके यांनी फिर्याद दिली आहे.

TET Exam Scam
Rohit Pawar Vs Radhakrishna Vikhe : तलाठी भरतीतील गैरप्रकारांची 'ती' गोपनीय फाईल; आमदार पवारांनी मंत्री विखेंना दिले आव्हान

मुख्याध्यापक नासीर ख्वाजालाल खान यांनी 17 फेब्रुवारी 2020 मध्ये शाळेतील शेख दानिस जब्बार आणि खान इम्रान आयुब या दोन शिक्षकांचा वैयक्तिक मान्यतेचा प्रस्ताव शिक्षक विभागाकडे सादर केला होता. यासाठी शिक्षक पात्रता परीक्षेचे (TET) सन 2018 च्या प्रमाणपत्राच्या झेराॅक्स प्रति जोडण्यात आल्या होत्या. मूळ प्रमाणपत्राची मागणी करताच राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्तांना शिक्षण विभागाने पत्र दिले होते. या पत्रानुसार दोन्ही शिक्षकांचे टीईटी प्रमाणपत्र बनावट असल्याचे निदर्शनास आले.

TET Exam Scam
Nilesh Lanke On Ram Shinde : 'पवारांचा नाद करू नका, नाहीतर तुमचं राजकीय...' ; खासदार लंकेंचा भाजपच्या शिंदेंना 'मित्रत्वा'चा सल्ला

तरी देखील मुख्याध्यापक नासीर ख्वाजालाल खान यांनी 31 मार्च 2021 मध्ये दोन्ही शिक्षकांना एकाच पत्राद्वारे शिक्षण सेवक आणि सहशिक्षक म्हणून मान्यता प्रदान केली. मात्र या मान्यतेची कोठेही नोंद नव्हती. दोन्ही शिक्षकांच्या मान्यतेसाठी पुणे शिक्षण उपसंचालांककडे सुनावणी झाली. शिक्षकांच्या मान्यतेची, आदेशाची नोंद नसणे आणि टीईटी प्रमाणपत्र बनावट असल्याचे या सुनावणीत उघड झाले. त्यानुसार पुणे शहर पोलिसांच्या सायबर शाखेत दोघा शिक्षकांविरुद्ध बनावट प्रमाणपत्राबाबत गुन्हा दाखल करण्यात आला.

मुख्याध्यापक, संबंधित दोन्ही शिक्षक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संगनमत करून कार्यालयातील नस्तीमधील गुणपत्राच्या प्रती काढून त्या जागी खान इम्रान आयुब याचे टीईटीचे सन 2019 चे गुणपत्रक व पात्रता प्रमाणपत्र ठेवले. यासाठी या पाच जणांनी कर्तव्यात कसूर केल्याचे आढळले. पुणे सायबर पोलिसांनी शिक्षणाधिकाऱ्यांना चौकशी करण्यास सांगितले. यानुसार कोतवाली पोलिस ठाण्यात या पाच जणांविरुद्ध फसवणुकीच्या गुन्ह्याची नोंद झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com