Nilesh Lanke On Ram Shinde : 'पवारांचा नाद करू नका, नाहीतर तुमचं राजकीय...' ; खासदार लंकेंचा भाजपच्या शिंदेंना 'मित्रत्वा'चा सल्ला

Political Advice From Nilesh Lanke To Ram Shinde : खासदार नीलेश लंके यांनी भाजपमधील आपल्या आमदार राम शिंदे मित्राला दिलेला सल्ला चर्चेत आला आहे.
Nilesh Lanke, Ram Shinde Nerws
Nilesh Lanke, Ram Shinde Nerws Sarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्षाचे खासदार नीलेश लंके आणि भाजप आमदार राम शिंदे यांच्यातील राजकीय मैत्री सर्वश्रुत आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी या मैत्रीची चर्चा होती. निवडणुकीनंतर काय निकाल लागायचा, तो लागला. आता मात्र आपल्या याच मित्राला खासदार लंके यांनी टोकाचा राजकीय सल्ला दिला आहे.

नाद करा पण पवारांचा नाद करू नका, अन्यथा तुमचं राजकीय नुकसान करून घ्याल, असा हा सल्ला आहे. आमदार शिंदे हा मित्राचा सल्ला कितपत मनावर घेतात, याकडे आता लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार नीलेश लंके यांचा कर्जत तालुक्यात मिरजगाव इथं आमदार रोहित पवार यांच्यावतीनं नागरी सत्कार झाला. खासदार लंके यांनी त्यांच्या स्टाईलमध्ये केलेलं भाषण आणि त्यातून त्यांचे राजकीय मित्र भाजपचे आमदार राम शिंदे यांना दिलेला सल्ला चर्चेत आला आहे.

"मी नेहमीच सांगतो की कुणाचाही नाद करा, पण पवारांचा नाद कुणी करू नये. कर्जत-जामखेडमध्ये कोणाच्या डोक्यात काही असेल, तर त्यांनाही सांगतो, हात जोडून विनंती करतो की, नाद करा पण, पवारांचा नाद करू नका. अन्यथा तुमचं राजकीय नुकसान करून घ्याल", असा सल्ला खासदार लंकेंनी भाजप आमदार शिंदे यांना नाव न घेता दिला आहे.

कोणाला वाटतं असेल उलट पालटं करू. पण काही होतं नसतं, तु्म्ही काळजी करू नका. 80 हजार ते 1 लाख मतांचं मताधिक्य रोहित पवारांना मिळेल, तेही केवळ रोहित पवारांच्या कामामुळे मिळेल, असेही खासदार लंकेंनी सांगितलं.

ग्राऊंड लेवलला काम

नीलेश लंके (Nilesh Lanke) यांनी आमदार शिंदे यांना सल्ला देतानाच आमदार रोहित पवार यांचे कौतुक केले. आमदार, खासदार झाल्यानंतर आपल्या मतदारसंघात रस्ते झाले पाहिजेत, ग्रामीण रुग्णालयं झालं पाहिजे, यापेक्षा वेगळा विचार कोणी करत नाही. रोहित पवार मात्र सर्वसामान्यांच्या झोपडीपर्यंत गेलेत. ग्राऊंड लेवला काम करत आहेत.

एखादा पेशंट अॅडमिट झाल्यानंतर त्याची विचारपूस करत दुसऱ्या हाॅस्पिटलमध्ये नेणारा माणूस, सर्वसामान्य कुटुंबातील मुलाला शिक्षणासाठी सायकल देण्याचा विचार करत त्यावर कृती करण्याची ताकद आमदार रोहित पवार यांच्याकडेच आहे, असे खासदार लंके यांनी म्हटले.

रोहित पवारांचा अंदाजच येत नाही

राज्यात सर्वाधिक डिजिटल शाळा कोणत्या विधानसभा मतदारसंघात असतील, तर त्या कर्जत-जामखेडमध्ये आमदार रोहित पवार यांच्या मतदारसंघात आहेत. महिलांसाठी रोजगार उपलब्ध करून देताना त्यांनी बचतगट चळवळीचे बळकटीकरण केले.

आरोग्य सेवेवर त्यांचे विशेष लक्ष असते. त्यासाठी त्यांनी उपजिल्हा रुग्णालय मंजूर करून घेतलं. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मतदारसंघात सर्वाधिक विकास निधी खेचून आणला, याचा अंदाज आम्हाला देखील येवू दिला नाही, असे म्हणत खासदार लंकेंनी आमदार रोहित पवारांचं कौतुक केले.

Nilesh Lanke, Ram Shinde Nerws
Jayant Patil Big Statement : 'येत्या महिन्याभरात दिल्लीत मोठी राजकीय उलाढाल...'; शरद पवारांचा थेट जयंत पाटलांना फोन

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com