Girish Mahajan News : वादग्रस्त पोस्ट टाकल्याने धुळ्यात डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल!

Case filed against doctor due to controversial post about Minister Girish Mahajan-पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याविरुद्ध पोस्टमुळे डॉक्टरच्या गाडीची तोडफोड.
Girish Mahajan & sabotage car
Girish Mahajan & sabotage carSarkarnama
Published on
Updated on

Dhule News : सध्या सुरू असलेल्या एका आंदोलनाबाबत पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने धुळे शहरातील डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या पोस्टमुळे संतप्त भाजप समर्थकांनी डॉक़्टरच्या वाहनाची तोडफोड केली. (BJP followers vandalized doctor`s vehicle)

धुळे (Dhule) शहरात काल हा प्रकार घडला. याबाबत पालकमंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या समर्थकाने पोलिसांत (Police) तक्रार केली आहे. वाहनांची तोडफोड केल्याने भाजपच्या (BJP) समर्थकांविरोधात देखील तक्रार करण्यात आली आहे.

Girish Mahajan & sabotage car
Dhule Congress News : ‘इंडिया’चा केंद्र, राज्य सरकारने घेतला धसका!

या पोस्टबाबत पालकमंत्र्यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त केली होती. सध्या राज्यात सुरू असलेल्या एका आंदोलनाच्या अनुषंगाने मध्यस्थीसाठी गेलेल्या ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याविषयी सोशल मीडियावर अवमानजनक पोस्ट प्रसारित केल्याप्रकरणी डॉ. संजय पिंगळे यांच्याविरुद्ध हा गुन्हा दाखल झाला.

भाजपचे प्रवीण अग्रवाल यांनी आझादनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यात म्हटले आहे, की बुधवारी माझ्या मोबाईलवर फेसबुक पाहत असताना शहरातील गांधी पुतळ्याजवळील ग्राहक भांडारसमोरील डॉ. संजय पिंगळे यांनी त्याच्या फेसबुक अकाउंटवर भाजपचे नेते तथा पालकमंत्री महाजन यांच्याबद्दल आक्षेपार्ह व अवमानजनक पोस्ट प्रसारित केली.

Girish Mahajan & sabotage car
Nashik Congress News : राहुल गांधी पुन्हा एकदा भारत जोडो यात्रा काढणार!

डॉ. पिंगळेंची फिर्याद

पालकमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने सायंकाळी साडेसातच्या सुमारास डॉ. पिंगळे यांच्या घराजवळ काही लोक आले. आम्ही भाजपचे कार्यकर्ते असल्याचे सांगत त्यांनी शिवीगाळ व दमदाटी केली. लाठ्याकाठ्या व रॉडने कार (एमएच १८, बीएक्स १७२८)ची तोडफोड केली. याबाबत डॉ. नीता पिंगळे यांच्या तक्रारीवरून आझादनगर पोलिस ठाण्यात सात संशयितांवर गुन्हा दाखल झाला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com