Dhule Congress News : ‘इंडिया’चा केंद्र, राज्य सरकारने घेतला धसका!

People are upset about BJP due to unemployment & inflation-आमदार कुणाल पाटील यांनी बेरोजगारी आणि महागाईमुळे जनता भाजपवर तीव्र नाराज असल्याचे सांगितले.
Kunal Patil
Kunal PatilSarkarnama

MLA Kunal Patil on BJP : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी देशातील विरोधी पक्ष अतिशय जोरकसपणे तयारी करीत आहेत. त्याचा भाजपने खूपच धसका घेतला आहे. याची जाणीव आता नागिरकांनादेखील झाली आहे. २०२४ मध्ये भाजपचा पराभव अटळ असल्याचा दावा काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील यांनी केला. (Centre Government of BJP is scare about INDIA alliance)

काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो यात्रेच्या वर्षेपूर्तीनिमित्त धुळे (Dhule) येथे झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार कुणाल पाटील (Kunal Patil) बोलत होते.

Kunal Patil
Nashik Congress News : राहुल गांधी पुन्हा एकदा भारत जोडो यात्रा काढणार!

यावेळी आमदार पाटील म्हणाले, आगामी निवडणुकांना महाविकास आघाडी म्हणजेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि इतर घटक पक्ष एकजुटीने सामोरे जातील.

केंद्रातील भाजपप्रणित एनडीए सरकारला सत्तेतून खाली खेचण्यासाठी देशात संघटित सर्व प्रमुख विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीची ताकद आणखी वाढली आहे. पूर्वी या आघाडीत २६ पक्षांचा समावेश होता. आता ही संख्या २८ झाली आहे. त्यामुळे ‘इंडिया’ नावाचा केंद्र व राज्याच्या भाजप सरकारने धसका घेतला आहे. त्यासाठी त्यांनी राज्यघटनेत असलेले इंडिया हे नाव मिटविण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे.

Kunal Patil
Republican Sena News : रिपब्लिकन सेना नेत्याचा पोलीस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न ; पोलिसांकडून दलितांवर अन्याय..

आमदार पाटील पुढे म्हणाले, की वाढती महागाई व बेरोजगारीमुळे जनता भाजप सरकारवर नाराज आहे. त्यात भारत जोडो यात्रेनिमित्त जिल्ह्यात सर्वसामान्यांशी संवाद साधला जात आहे. भारत जोडो यात्रेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त काँग्रेसतर्फे देशात सर्वत्र ही यात्रा काढली जात आहे.

यंदा अत्यल्प पावसामुळे बळीराजा संकटात आहे. खरिपातील पिके करपली. शासनाने बीड, जळगाव जिल्ह्यात पीकविम्याची अग्रिम रक्कम नुकसानभरपाई म्हणून जाहीर केली. याबाबत धुळे व नंदुरबार जिल्ह्याला उपेक्षित, वंचित ठेवले आहे. पालकमंत्र्यांनी दुष्काळी स्थितीची दखल घेतलेली नाही.

Kunal Patil
Ashok Chavan News : अशोक चव्हाण म्हणतात, "घटनात्मक दुरुस्तीशिवाय मराठा आरक्षण शक्य नाही, केवळ बैठका नको,"

मोदी सरकार अपयशी

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होणे तर दूर उलट खत अनुदान, कृषी, संलग्न क्षेत्रावरील खर्च कपात व ग्रामीण विकासाकडे दुर्लक्षाचा फटका उत्पन्नातील घटीच्या रूपाने शेतकऱ्याला बसत आहे. त्याच्यावर कर्जाचा डोंगर वाढत आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढतच आहेत.

बाजार समितीचे सभापती बाजीराव पाटील, भगवान गर्दे, मुज्जफर हुसेन, यशवंत खैरनार, गुलाबराव कोतेकर, युवराज करनकाळ, रमेश श्रीखंडे, अशोक सुडके, साबीर शेख, पंढरीनाथ पाटील, प्रमोद जैन, भानुदास गांगुर्डे, दीपक साळुंखे आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com