राष्ट्रवादीचे आमदार नितीन पवार यांनी कळवणला बाजी मारली

महाविकास आघाडी १४ जागा जिंकून पुन्हा सत्तेत आली.
NCP winning candidates at Kalwan.
NCP winning candidates at Kalwan.Sarkarnama
Published on
Updated on

कळवण : कळवण नगरपंचायतीत महाविकास आघाडीने १४ जागा जिंकून सत्ता राखली. येथे भाजपला (BJP) केवळ दोन जागा मिळाल्या. मनसेने खाते उघडले असून, कळवणकरांनी नगरपंचायतीच्या चाव्या पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) गटनेते कौतिक पगार यांच्याकडे दिल्या आहेत.

NCP winning candidates at Kalwan.
निफाडला अनिल कदमच बॅास; राष्ट्रवादीच्या आमदार दिलीप बनकरांना धक्का

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नितीन पवार यांच्यात सरळ लढत होऊन दोघांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. शहरात प्रचार केल्यामुळे या निवडणुकीत आमदार नितीन पवार यांची पुन्हा एकदा सरशी झाली. त्यामुळे गटनेते कौतिक पगार यांची सत्ता पुन्हा एकदा नगरपंचायतीवर आली आहे. १७ पैकी राष्ट्रवादी काँग्रेसने नऊ जागांवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. काँग्रेसला तीन, शिवसेना आणि भाजपला प्रत्येकी दोन, तर मनसेला एक जागा मिळाली.

NCP winning candidates at Kalwan.
एकनाथ खडसेंना धक्का; बोदवड नगरपंचायत शिवसेनेच्या ताब्यात

सर्वाधिक मते मिळविणारे राष्ट्रवादीचे गटनेते कौतिक पगार व बिनविरोध विजयी झालेल्या प्रथम नगराध्यक्षा सुनीता पगार हे पती-पत्नी पुन्हा नगरपंचायतीमध्ये गेले आहेत. कळवणच्या राजकीय इतिहासात त्याची नोंद झाली आहे. सर्वांत कमी अवघ्या २८ मतांनी विजयी झालेले मनसेचे चेतन मैंद या निवडणुकीत ‘जायंट किलर’ ठरले आहेत. त्यांनी कमकोचे अध्यक्ष सुनील महाजन यांचा पराभव करून सर्वांचे लक्ष वेधले.

पहिल्या पंचवार्षिकमधील विद्यमान राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते कौतिक पगार, प्रथम नगराध्यक्षा सुनीता पगार, बाळासाहेब जाधव, माजी नगराध्यक्ष मयूर बहिरम, शिवसेनेच्या रोहिणी महाले हे पुन्हा नगरपंचायतीमध्ये विजयी झाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान नगरसेविका अनुराधा पगार यांना प्रभाग १५, तर भाजपच्या नगरसेविका सुरेखा जगताप यांना प्रभाग दोन व सहा या दोन्ही ठिकाणी मानहानिकारक पराभवाला सामोरे जावे लागले. राष्ट्रवादी काँग्रेसचे राहुल पगार, गौरव पगार, मोतीराम पवार, हर्षाली पगार, ज्योत्स्ना जाधव, लता निकम, काँग्रेसचे तेजस पगार, रत्ना पगार, शिवसेनेच्या ताराबाई आंबेकर, मनसेचे चेतन मैंद, भाजपच्या भारती पगार, भाग्यश्री शिरोरे हे नवीन चेहरे या निवडणुकीत विजयी झाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com